ऋषभ पंतला भेटायला रुग्णालयात पोहोचली उर्वशी रौतेला? तो फोटो शेअर केल्याने चर्चेला उधाण


मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला मुंबईत असून ती क्रिकेटर ऋषभ पंतवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच रुग्णालयाजवळ होती. मागील आठवड्यात ऋषभ पंतचा अपघात झाला होता. सध्या तो मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ऋषभ आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा होत्या. त्यानंतर दोघं एकमेकांवर अनेकदा टीका करताना दिसले आहेत. आता उर्वशीने कोकिलाबेन रुग्णालयाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर ती कदाचित ऋषभला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली असल्याची चर्चा आहे.

ऋषभला भेटायला पोहोचली उर्वशी?

उर्वशी रौतेलाने गुरुवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ऋषभ पंत दाखल असलेल्या रुग्णालयाचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन ती त्या रुग्णालयाजवळच असल्याचं समजत होतं. तिने केलेली पोस्ट कोणत्याही कॅप्शनशिवाय होती, पण ती मुंबईतच असल्याचं तिने टॅग केलं होतं. उर्वशीने हा फोटो शेअर केल्यानंतर हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

बुधवारी ऋषभला त्याच्या शस्त्रक्रियेसाठी देहरादूनहून मुंबई आणण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (BCCI) एक अधिकृत निवेदन जारी केलं होतं. यात त्यांनी ऋषभला लिगामेंट टियर शस्त्रक्रिया आणि त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेतून जावं लागेल असं सांगितलं होतं.

टीमकडून आलेल्या माहितीनुसार, ऋषभला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केलं आहे. त्याच्यासोबत डॉ दिनशॉ पारदीवाला हे स्पोर्ट्स मेडिसिन सेंटरमध्ये आर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत. ऋषभवर शस्त्रक्रिया होणार असून बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर उपचारावेळी आणि लिगामेंट टियर नंतरच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.

नवं वर्षाच्या अगदी एक दिवस आधी ३० डिसेंबर रोजी ऋषभचं कार अपघात झाला होत. तो दिल्लीवरुन रुरकीला निघाला होता. त्याचवेळी त्याची कार हमदापूर झालजवळ डिव्हाइडरवर धडकली. दिल्ली-देहरादून हायवेवर ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ऋषभ कारमध्ये एकटा होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि पायाला मार लागला आहे. ऋषभच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्याची कार पूर्णपणे जळून खाक झाली.

उर्वशीने केलेली ऋषभसाठी पोस्ट

ऋषभच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर उर्वशीने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोला तिने प्रार्थना असं इतकंच कॅप्शन दिलं होतं. पुढे हॅशटॅग देत प्रेम असंही कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं. या पोस्टमध्ये तिने कुठेही ऋषभ पंतच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर तिने एक ट्विटही केलं होतं. त्या ट्विटमध्ये तिने नाव न घेता, मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करते असं म्हटलं होतं.Source link

Leave a Reply