कपूर कुटुंबातील लोकप्रिय कपलचं झालं ब्रेकअप; अनेक वर्ष करत होते एकमेकांना डेट


मुंबई: २०२२ या वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली अन् अनेकांनी वेगळे होण्याचाही निर्णय घेतला. सोशल मीडियावर या ब्रेकअर, घटस्फोट आणि लग्नांची विशेष चर्चा झाली. दरम्यान आता २०२३ च्या सुरुवातीलाच एका लोकप्रिय कपलच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या कपूर कुटुंबातील हे ब्रेकअप असल्याने चर्चा तर होणारच! हे दोन्ही कलाकार लवकरच लग्न करणार अशी चर्चा असताना त्यांच्या ब्रेकअपची माहिती मिळाली आहे.

ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून तारा सुतारिया आणि आदर जैन हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तारा-आदर रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांसोबत फॅमिली फंक्शनमध्येही अनेकदा ते एकत्र दिसायचे. ताराने कपूर कुटुंबातील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली होती. सार्वजनिक ठिकाणी, बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्येही तारा-आदर एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे तारा लवकरच आदरशी लग्न करणारे असेही बोलले जात होते. दोघांनी सामंज्यसाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. ईटाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले.

हे वाचा-प्रार्थना बेहेरेने शेअर केला सर्वात बोल्ड व्हिडिओ; नाराज चाहते म्हणाले- ‘हे अजिबात आवडलेले नाही…’

दरम्यान असेही अपडेट समोर आले की, दोन्ही स्टार्स गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर एकमेकांबद्दल चांगल्याच पोस्ट शेअर करत आहेत. त्यांच्यामध्ये भांडण झाले असावे असेही काही चित्र दिसले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ते दोघेही प्रौढ आहेत आणि ते यानंतरही मित्रच राहतील. एकमेकांची प्रेमाने काळजी घेतील.’

आदर आणि तारा यांनी त्यांचे नाते २०२० साली सोशल मीडियावर ऑफिशिअल केले होते. त्यांची भेट एका दिवाळी पार्टीमध्ये झाली होती, एका कॉमन फ्रेंडने त्यांची ओळख करून दिली होती. याशिवाय सोशल मीडियावरही त्यांनी एकमेकांसोबत विविध फोटो पोस्ट केलेले. २०२३ मध्ये तारा-आदर यांच्या लग्नाचे वृत्त समोर येईल, असा चाहत्यांचा अंदाज असताना त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले. आदर हा ऋषी कपूर-रणधीर कपूर यांची बहीण रीमा कपूर यांचा मुलगा, त्यामुळे तारा-आदर यांचं लग्न झाले असते तर नात्याने तारा रणबीर कपूर, करिना-करिष्मा कपूर यांची वहिनी झाली असती.Source link

Leave a Reply