कुटुंब काश्मिरी तरी ‘खान’ आडनाव का लावतो? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलं मनं जिंकणारं उत्तर


मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा अवघ्या काहीच दिवसात सिनेमागृहात दाखल होणार आहे. २५ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. दीपिका पादुकोण आणि शाहरुख यांची मुख्य भूमिका असणारा ‘पठाण’ प्रदर्शनाआधीच वादात सापडला. या सिनेमातील गाण्यावरुन मोठा वादंग उठला. ‘बेशरम रंग’ हे गाणे रीलिज झाल्यापासूनच चर्चेत आहे. एकंदरित शाहरुखच्या पठाणची हवा सर्वत्र पाहायला मिळाली. या दरम्यान शाहरुखने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ट्विटरवर त्याने युजर्सची संवाद साधत अनेक ट्वीट केले आहेत.

शाहरुख अनेकदा ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधतो. #AskSRK अशा हॅशटॅगअंतर्गत तो ट्विटरवर चॅट सेशन करतो. दरम्यान बुधवारीही १५ मिनिटांसाठी शाहरुख ट्विटरवर सक्रिय होता आणि त्याने विविध प्रश्नांची उत्तरं दिली. अगदी आलिया भट्टच्या प्रश्नाचे उत्तरही त्याने दिले. इतरही काही ठराविक युजर्सना त्याने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिली. शाहरुखच्या #AskSRK सेशनमध्ये त्याचा विनोदी अंदाज पाहायला मिळतो, आजही त्याने काही विनोदी ट्वीट केले आहेत. मात्र एका ट्वीटने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि युजर्सकडून त्याचे कौतुक होत आहे.

हे वाचा-माझा आतापर्यंतचा सर्वात उत्तम निर्णय… घटस्फोटादरम्यान मानसी नाईकची पोस्ट चर्चेत

एका युजरने असा सवाल केला होता की, ‘खानसाहेब, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काश्मिरी आहे ना? तरीही तुम्ही तुमच्या नावासोबत खान का जोडता?’ याचे उत्तर देताना शाहरुख म्हणतो की, ‘संपूर्ण जग हे माझं कुटुंब आहे. कुटुंबाच्या नावामुळे नाव मोठं होत नाही, तुमच्या कामामुळे तुमचं नाव होतं. कृपया अशा संकुचित विचारात अडकू नका.’ शाहरुखच्या ट्वीटवर अनेकांनी रिप्लाय देत त्यांची मत मांडली आहेत. काहींनी त्याच्यावर टीका केलीये तर काहींना एसआरकेची स्टाइल आवडली आहे.

हे वाचा-रितेश देशमुखने ‘वेड लावलंय’! पहिल्या दिवसापेक्षा पाचव्या दिवशी बक्कळ कमाई; सिनेमाने कमावले किती कोटी?

दरम्यान पठाण सिनेमाच्या वादाबाबत बोलायचे झाल्यास, या सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणं १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालं आणि तेव्हापासून वाद सुरू झाला. या गाण्यातील दीपिकाचे कपडे, दीपिका-शाहरुखमधील इंटिमेंट सीन आणि एका शॉटमध्ये दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी या गोष्टींमुळे मोठा वादंग उठला. सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जातेय. एवढेच नव्हे तर शाहरुख-दीपिकाला जीवे मारण्याची धमकीही मिळाली. या परिस्थितीत शाहरुखचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.Source link

Leave a Reply