नसीरुद्दीन यांना बोलू देत नाहीत रत्ना पाठक, म्हणाल्या- घरावर कोणी दगडफेक केली तर…’


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सामाजिक अथवा राजकीय घटनेवर निर्भिडपणं त्याचं मत मांडताना दिसतात. कधी त्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे वाद निर्माण होतो. काहींना त्यांनी व्यक्त केलेली मतं आवडत नाहीत. अशावेळी नसीरुद्दीन यांनी व्यक्त केलेल्या मतांवर विविध पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत असतात. अनेकदा त्याचा फटका नसीरुद्दीन शाह यांच्या कुटुंबियांना सोसावा लागतो. याबाबत नसीरुद्दीन यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना शाह यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांची प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की मी अनेकदा नसीरुद्दीन यांना सार्वजनिक ठिकाणी मतप्रदर्शन करण्यापासून थांबवते. कारण या मतप्रदर्शनामुळे घरावर दगड मारले जातील, अशी भीती वाटत असल्याचं रत्ना यांनी सांगितलं.

काय म्हणाल्या रत्ना पाठक

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये रत्ना पाठक यांनी सांगितलं की,’आजच्या काळात जर कुणी तुमच्यासमोर येऊन उभं राहिलं आणि तुमच्या घरावर दगड फेकून मारले तर तुम्ही काय कराल. त्यामुळे मी नसीर यांना अनेकदा कोणत्याही घटनेवर मत व्यक्त करण्यापासून थांबवते. आता आमच्यासारख्या वयोवृद्ध झालेल्या अभिनेत्यांना काम मिळणं बंद झालं आहे. मिळालं तरी मोठ्या मुश्किलीन काम मिळतं. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. आम्हाल फक्त चांगल्या पद्धतीनं जगायचं आहे. घाबरून जगायचं नाही. परंतु जेव्हा नसीर एखाद्या विषयावर त्याचं मत व्यक्त करतात तेव्हा मात्र आम्हाला भीती वाटते.’

चुकीच्या गोष्टी सुधारण्याचा ठेका…

रत्ना यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘जगात अनेक गोष्टी चुकीच्या होत असतात. आपण सांगितलं नाही तर त्या गोष्टी सुधारत नाहीत. परंतु प्रत्येक चुकीची गोष्ट सुधारण्याची जबाबादरी आम्ही घेतलेली नाही ना… आतापर्यंत आयुष्य सुरू आहे. आता जे पुढे होईल ते बघू असं म्हणत आयुष्य जगत आहोत.’

रत्ना पाठक यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्या लवकरच गुजराती सिनेमांत दिसणार आहेत. विरल शाह याच्या ‘कच एक्स्प्रेस’ सिनेमात त्या प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर नसीरुद्दीन शाह लवकरच अर्जुन कपूर आणि तब्बू यांच्या ‘कु्त्ते’ सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमांत कोंकणा सेन शर्मा, राधिका मदान, कुमुद मिश्रा, शार्दुल भारद्वाजदेखील आहेत. अर्जुन सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. तर काही दिवसांपूर्वी तब्बू आणि अर्जुन कपूर कुत्र्याच्या एका छोट्या पिल्लाबरोबर खेळताना दिसला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.Source link

Leave a Reply