मी तरी व्हर्जिन कुठेय? दोन घटस्फोट झालेल्याशी लग्न केल्यानं ट्रोल करणाऱ्यांना नेहा पेंडसेनं सुनावलेलं


मुंबई- छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहाची हटके स्टाइल आणि गोड चेहरा प्रेक्षकांना भावला आणि काही काळातच तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मालिका आणि चित्रपटात नाव कमावणारी नेहा २०२० साली लग्नाच्या बेडीत अडकली. मात्र तिच्या होणाऱ्या पतीला पाहून अनेकांनी नाकं मुरडली. कारण तो आधीपासून घटस्फोटित होता. शार्दूल याचे एक नाही तर दोन घटस्फोट झाले होते. त्यानंतर सुरू झाल्या त्या चर्चा. मात्र लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने या सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली. आपल्या उत्तराने तिने नेटकऱ्यांची तोंडं कायमची बंद केली. असं काय म्हणालेली नेहा, चला जाणून घेऊया.

neha pendse

​अभिनयाची सुरुवात

नेहाने १९९५ साली ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘पडोसन’ , ‘हसरते’, ‘खुशी’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली. ती ९० च्या दशकातील एक लोकप्रिय चेहरा बनली. त्यानंतर तिने नृत्य प्रशिक्षण घेतलं. २०११ मध्ये तिने झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ या कार्यक्रमात आपल्या नृत्याचा जलवा दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. सोबतच तिने ‘शर्यत’ आणि ‘कुरुक्षेत्र’ चित्रपटातही काम केलं. त्यापूर्वी ती झी मराठीवरील ‘भाग्य लक्ष्मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती.

​बोल्ड नृत्यावरून चर्चा

नेहाने ‘शर्यत” या २०११ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बोल्ड नृत्य करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने या चित्रपटात ‘शीलाच्या आयचा घो’ या गाण्यावर नृत्य केलं होतं. तिच्या या गाण्याच्या शब्दांवरून वेगळा वाद निर्माण झाला होता. तेव्हा हे गाणं प्रचंड गाजलं होतं. मात्र त्याहीपेक्षा गाजली होती ती नेहाची बोल्ड स्टाइल आणि अदा. नेहाचा हा नवा अवतार पाहून नेटकरी चकीत झाले होते. काहींनी तिचं कौतुक केलं होतं तर काहींनी तिला ट्रोल केलं होतं. त्यामुळे ती आणखीनच प्रकाशझोतात आली.

​हिंदीमध्येही केली एंट्री

त्यानंतर नेहाने तिचा मोर्चा हिंदीकडे वळवला. ती २०१८ साली ‘बिग बॉस १२’ मध्ये सहभागी झाली होती. मात्र काही आठवड्यातच तिला घराबाहेर व्हावं लागलं. त्यानंतर तिने ‘चंद्रमुखी चौटाला’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. आजही काही प्रेक्षक तिला याच नावाने ओळखतात. तर सध्या ती ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत गोरी मॅम म्हणजे अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. तिची ही भूमिकाही प्रेक्षकांना तितकीच पसंत पडते आहे. मात्र या सगळ्यात जास्त गाजलं ते तिचं लग्न.

​२०२० साली बांधली लग्नगाठ

नेहाने ५ जानेवारी २०२० रोजी भारतीय व्यावसायिक शार्दूल सिंह बयासशी लग्नगाठ बांधली. मात्र या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. शार्दूलचं हे तिसरं लग्न होतं. नेहाशी लग्न करण्यापूर्वी शार्दूलची दोन लग्न झाली होती आणि या लग्नापासून त्याला दोन मुलंही आहेत. त्यामुळे दोनदा घटस्फोट झालेल्याशी लग्न केल्यामुळे नेटकऱ्यांनी नेहाला प्रचंड ट्रोल केलं होतं. मात्र लग्नानंतर दिलेल्या मुलाखतीत तिने ट्रोलर्सचा चांगला समाचार घेतला होता. शार्दूलची दोन लग्न झाली असतील तर मी तरी कुठे व्हर्जिन आहे, असा बिनधास्त प्रश्न विचारत तिने सगळ्यांची बोलती बंद केली होती.

​काय म्हणालेली नेहा?

मुलाखतीत नेहा म्हणालेली, ‘मी त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीला भेटले आहे. इतकंच नाही त्याची मुलगी आणि मी सोशल मीडियावर फ्रेंड्स आहोत. आम्हाला कुणापासून काहीही लपवायचं नाहीये की शार्दुलचं आधीही लग्न झालंय. आम्ही एकमेकांबद्दल जाणून घेऊनच हा निर्णय घेतला. लोक त्याच्या दोन लग्नाचा एवढा इशू का करतायत? मी पण व्हर्जिन नाहीये. उलट मी शार्दुलच्या या वागण्याचं कौतुक करते की त्याने त्याला जी व्यक्ती आवडते तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. जिच्यावर तो प्रेम करतो तिची निवड त्याने केली. त्याचं आयुष्य तो त्याच्या मनाप्रमाणे जगू शकतो. त्यात एवढं चर्चा करण्यासारखं काहीही नाही.’

​बोल्ड सीन करायला नसेल हरकत

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहाने बोल्ड सीन करायला आपली काहीही हरकत नसल्याचं म्हटलं होतं. नेहा म्हणालेली, ‘मी बोल्ड सीन किंवा किसिंग सीन करायला तयार आहे. मला त्यात काहीच अडचण नाहीये. ज्या कलाकाराला त्यात अडचण असेल तर त्याने त्या चित्रपटाचा भाग होऊ नये. हे सगळं दिग्दर्शकावर असतं. ते सीन चांगले बनवण्याची ताकद त्याच्याकडे असते. नाहीतर ते खूप विचित्र वाटू शकतात. पण मी असे सीन करायला नक्कीच तयार आहे.Source link

Leave a Reply