लहानमुलांसोबत चुकूनही पाहू नका हे चित्रपट, ओलांडल्या बोल्ड सीनच्या सर्व मर्यादा


ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे कोणत्याही सेन्सॉरशिपविना दाखवला जाणारा मुक्त, बोल्ड कन्टेंट. चित्रपट आणि टीव्ही मालिकांपेक्षा वेगळ्या धाटणीचा, काही वेळा बोल्ड आशयही पाहायला मिळत असल्यानं प्रेक्षकांनी ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मचं स्वागत केलं. तरुणांसह सर्वच वयोगटातले प्रेक्षकही हे माध्यम आवडीनं पाहत असतात. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बोल्ड सीन, सेक्स सीन आणि अश्लील भाषेचा वापर करण्यावर भर देण्यात येतोय. पण ओटीटी हे माध्यम येण्यापूर्वीही काही बोल्ड चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. आता हे चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत.

‘आशिक बनाया आपने (Aashiq Banaya Apne)’

काही वर्षांपूर्वी आलेला ‘आशिक बनाया आपने’ हा चित्रपट बोल्ड सीनमुळं प्रचंड चर्चेत आलं होता. या चित्रपटातील गाणी देखील आजही लोकप्रिय आहेत. तसंच चित्रपटाच्या बोल्ड सीनवर आजही मीम्स व्हायरल होताना दिसतात.इम्रान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटानंतर इम्रान हाश्मीची ओळख बॉलिवूडचा सिरियल किसर अशी झाली आहे. हा चित्रपट एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे.

​’सिन्स (Sins)’

-sins

शाइनी अहूजा आणि सीमा रहमानी यांचा ‘सिन्स’ हा चित्रपट २००५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायाला मिळाले होते. तसंच हॉट आणि बोल्ड सीन्सचा तडकाही या चित्रपटात होता. या चित्रपट आजही बोल्ड सीनसाठी चर्चेत असतो. हा चित्रपट प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइमवर पाहता येऊ शकतो.

‘गर्लफ्रेंड (Girlfriend)’

-girlfriend

ईशा कोप्पिकर आणि अमृता अरोरो यांच्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. त्यामुळं दोघींचे सीन्सही त्यावेळी प्रचंड चर्चेत आले होते. हा चित्रपट युट्यूबवरही उपलब्ध आहे.

​’जूली (Julie)’

-julie

बोल्ड सीनमुळं चर्चेत आलेल्या चित्रपटांमध्ये ‘जूली’ हा एक चित्रपट देखील आहेत. नेहा धूपिया आणि संजय कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या भावना या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. हा डिज्ने प्लस हॉटस्टारच्या युझर्संना पाहता येऊ शकतो.

​’बी.ए.पास (B.A. Pass)’

-b-a-pass

२०१२मध्ये आलेल्या शिल्पा शुक्ला हिच्या बी.ए.पास या चित्रपटानं धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात वेगवेगळ्या महिलांचं वैवाहिक आयुष्य आणि शारीरिक सुख यांवर भाष्य करण्यात आलं होतं. एक महिला तिच्या शारीरिक सुखासाठी एका कॉलेजला जाणाऱ्या मुलाचा कसा वापर करते, हे या चित्रपटात दाखण्यात आलं होतं.Source link

Leave a Reply