शरद पोंक्षेंनी केली छत्रपतींची- बाजीरावाशी तुलना, नेटकऱ्यांनी भयंकर सुनावलं


मुंबई- मोठ्या पडद्यासह छोटा पडदा गाजवणारे अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. यासोबतच ते अनेक ठिकाणी सावरकरांविषयी व्याख्यानं देण्यासाठी जात असतात. त्यांच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. मात्र काही वेळेस त्यांच्या भाषणांमुळे ते ट्रोल होताना दिसतात. आताही असंच काहीतरी घडलंय. शरद यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतायत. नुकत्याच केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांची तुलना केली. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना सुनावलं आहे. छत्रपतींचा इतिहास तुमच्याकडून ऐकण्याएवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांना सुनावलं आहे.

या भाषणात बोलताना शरद म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल राजा यांची जुनी मैत्री होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रसाल राजाला वचन दिलेलं की तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे. त्या छत्रसाल राजाने पेशव्यांना निरोप पाठवला, मला भीती वाटतेय की मी संपून जाईन. पेशव्यांचं वैशिष्ट्य काय की छत्रपतींनी दिलेला शब्द यांनी पाळला. मध्ये चार पिढ्या गेल्या. मात्र यांनी तो शब्द पाळला आणि तिकडे जाऊन छत्रसालाला वाचवलं. त्याला वाचवलं म्हणून तिथला एक तृतीयांश भाग म्हणजेच नऊ गावं त्यांना भेट म्हणून मिळाली. खरं तर ही गावं घेऊन ते त्या प्रदेशाचे राजे होऊ शकले असते. पण नाही स्वामी निष्ठा काय असते हे पेशव्यांकडून शिकावं. ती नऊ गावं तो जिंकलेला प्रदेश त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याला दिला. छत्रपतींच्या गाडीला अर्पण केला. ते सहज तो प्रदेश घेऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही.’

शरद यांचं भाषण ऐकून एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘मुळात छत्रपती आणि बाजीराव यांची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती नसते तर पेशवे आलेच नसते.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘छत्रपतींनी कधी पेशव्यांप्रमाणे बायका नाही नाचवल्या. त्यांच्यासाठी परस्त्री मातेसमान होती. तुम्ही असेच राहा.’ आणखी एकाने लिहिलं, ‘पोंक्षे साहेब इतिहास विषय इतिहास काराणासाठी ठेवा. महाराष्ट्राच्या आणि मराठा साम्राज्याच्या द्वैदीपमान इतिहासाचे धिंडवडे निघाले आहेत.’ आणखी एकाने लिहिलं, ‘छत्रपती शिवरायांवर निष्ठा याचा संदर्भ घेऊन बाजीराव पेशवे यांचा कशासाठी संबंध जोडला जातो हे लक्षात येत नाही .’ ट्विट करत नेटकऱ्यांनी अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.Source link

Leave a Reply