सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनी फ्लॅटला मिळाला नवा भाडेकरू, आता इतकं आहे भाडं आणि डिपॉझिट


मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं १४ जून २०२० रोजी निधन झालं. मुंबईतील त्याच्या राहत्या घरी त्याचा सुशांत मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर तो वांद्र्यात राहत असलेला फ्लॅट खाली होता. सुशांतच्या निधनानंतर जवळपास अडीच वर्ष या घरात कोणीच राहत नव्हतं. कोणीही या फ्लॅटमध्ये राहण्यास तयार नव्हतं. पण आता सुशांत राहत असलेल्या या घराला आता नवा भाडेकरू मिळाला आहे. रिअल इस्टेट ब्रोकर रफीक मर्चेंटने याबाबत माहिती दिली आहे.

रफिक मर्चेंटने जवळपास दोन महिने आधी सुशांत सिंह राजपूत राहत असलेल्या फ्लॅटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत त्याने हा फ्लॅट रिकामा असून त्याला कोणीही भाडेकरू मिळत नसल्याचं त्याने सांगितलं होतं. फ्लॅट पाहण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या फ्लॅटची हिस्ट्री समजते आणि सुशांत सिंह राजपूतचं निधन याच फ्लॅटमध्ये झाल्याचं समजतं, तेव्हा कोणीही इथे राहण्यास तयार होत नाही असंही त्याने या सांगितलं होतं.

हेही वाचा – Deepika Padukone Birthday:..अन् दीपिकाच्या एका उत्तरानं थांबल्या होत्या घटस्फोटाच्या चर्चा

मीडिया रिपोर्टनुसार, रफिक मर्चेंटने सांगितलं, की लोक सुशांत राहत असलेला हा फ्लॅट घेण्यासाठी घाबरतात. पण आता एक व्यक्ती हा फ्लॅट घेण्यासाठी तयार झाला आहे. त्या व्यक्तीने हा फ्लॅट महिन्याला ५ लाख रुपये भाड्याने घेतला आहे. त्याशिवाय त्याला ३० लाख रुपये सिक्योरिटी जमा करावी लागेल. ही सिक्योरिटी ६ महिन्यांचं डिपॉझिट असेल.

सुशांत दर महिन्याला द्यायचा इतकं भाडं?

सुशांत वांद्र्यातील या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. हा फ्लॅट माउंट ब्लॅक अपार्टमेंटमध्ये असून २५०० स्क्वेअर फूट इतका आहे. रिपोर्ट्सनुसार, सुशांत या फ्लॅटमध्ये राहत असताना दर महिन्याला ४.५१ लाख रुपये इतकं महिन्याचं भाडं देत होता.

हेही वाचा – सुशांतचा हा शेवटचा व्हिडिओ? गोंधळलेल्या अभिनेत्याचा हा Video पाहून चाहते भावूक

समुद्रकिनारी असलेल्या फ्लॅटमध्ये एक ड्रॉइंग रुम, चार मोठ्या खोल्या आणि एक मोठा हॉल आहे. सुशांतच्या निधनानंतर हा फ्लॅट रिकामा आहे. या फ्लॅटच्या मालकालाही भाडेकरू शोधण्यासाठी मोठी समस्या येत होती.

हेही वाचा – Rhea Chakraborty: सुशांतची हत्या झाली होती? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट; म्हणाली, पुढच्या वेळी…

फ्लॅट मालकाने ठेवली होती एक अट

रिअल इस्टेट ब्रोकर रफीक मर्चेंटने दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅटचा मालक रुमचं भाडंही कमी करण्यास तयार नव्हता. भाडं कमी केलं तर फ्लॅटला लवकर भाडेकरू मिळू शकत होता. फ्लॅटचा मालक एक एनआरआय असून तो त्याची रुम कोणत्याही फिल्म स्टारला देऊ इच्छित नाही. कितीही मोठा सेलिब्रिटी असला, तरी फ्लॅट आता फिल्म इंडस्ट्रीतील व्यक्तीला न देता एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमधील व्यक्तीला दिला जावा.Source link

Leave a Reply