Site icon CineShout

अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी ४ चा विजेता! अपूर्वा नेमळेकरला हरवून जिंकले चौथे पर्व

अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी ४ चा विजेता! अपूर्वा नेमळेकरला हरवून जिंकले चौथे पर्व


मुंबई: ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४ च्या पर्वाचा ८ जानेवारी रोजी समारोप झाला. या महाअंतिम सोहळ्याची स्पर्धा अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने यांच्यामध्ये रंगली. या स्पर्धकांमधून ज्याने सर्वाधिक मतं मिळवली त्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या पर्वाचा विजेता ठरला आहे- अक्षय केळकर!

अपूर्वा नेमळेकर आणि आणि अक्षय केळकर या टॉप २ स्पर्धकांमध्ये महाअंतिम सोहळा रंगला. या दोघांना महेश मांजरेकरांनी व्यासपीठावर बोलावल्यानंतर स्पर्धेतील धाकधुक आणखी वाढली होती. आधी महेश मांजरेकरांनी अक्षयला ‘बेस्ट कॅप्टन’ हा पुरस्कार देत ५ लाखाचा चेक देऊ केला. अक्षय १५.५५ लाख रुपयांची रक्कम आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्याकडून १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचरही त्याला मिळाले. पूर्वाला हरवून अक्षयने BBM4 ची ट्रॉफी जिंकली.

१०० दिवसांपासून या खेळात टिकलेल्या अक्षयची पहिल्या दिवसापासून चर्चा झाली होती. तो हुशारीने खेळला, त्याचप्रमाणे कोणाचेही मन न दुखावल्यामुळे अक्षयचे नाव चर्चेत राहिले. अक्षयचे बिग बॉस मराठीचे हे पर्व जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या बिग बॉस मराठीच्या पर्वामध्ये १६ स्पर्धक सहभागी झाले होते, त्यांच्यापैकी या ५ जणांनी बाजी मारत महाअंतिम सोहळ्यापर्यंत मजल मारली होती. अलीकडच्या एपिसोडमधून अभिनेता प्रसाद जवादे या स्पर्धेतून बाहेर पडला, तर मिड वीक एव्हिक्शनमध्ये आरोह वेलणकरला घरातून बाहेर पडावे लागले. ‘टिकिट टू फिनाले’चा टास्क जिंकत अपूर्वा या पर्वातील पहिली फायनलिस्ट ठरली होती. यानंतर अक्षय, राखी, किरण आणि अमृता यांनीही फिनाले गाठला.

बिग बॉसचं चौथं पर्व जिंकणाऱ्याला लाखो रुपयांच बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार असल्याचं समोर आल्यापासून प्रेक्षक उत्सुक होते की हा मान कोण पटकावेल. तर हे बक्षीस आणि ट्रॉफी अक्षयने जिंकली. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर बिग बॉस मराठी ४ विजेत्याचे आणि महाअंतिम सोहळ्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.


९ लाख जिंकली राखी सावंत पडली बाहेर!

टॉप ५ स्पर्धकांपैकी पहिल्यांदा बाहेर पडली राखी सावंत आणि तेही ९ लाख रुपये घेऊन! बिग बॉसने अशी संधी दिली होती की ९ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडता येईल. हे एकत्र ९ लाख रुपये मिळतील किंवा काहीच नाही असा पर्याय ठेवण्यात आला. हे ९ लाख रुपयांची निवड करत राखी सावंत घराबाहेर पडली. राखीनंतर अमृता धोंगडे घराबाहेर पडली. त्यानंतर किरण, अपूर्वा आणि अक्षय यांच्यामध्ये ही स्पर्धा रंगली होती.

घराबाहेर होण्यापूर्वी सर्व स्पर्धकांना विजेत्याला मिळणाऱ्या रकमेपैकी काही भाग घेऊन आधीच माघार घेत घराबाहेर होण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचं सोनं करत राखी सावंत हिने ९ लाख रुपये घेत घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घरात केवळ अक्षय, अपूर्वा, अमृता आणि किरण उरले होते. त्यानंतर घराबाहेर जाण्यासाठी एक छोटासा खेळ खेळण्यात आला. त्यात अमृता धोंगडे घराबाहेर झाली.


घरात केवळ तीन सदस्य उरले होते. पुन्हा एकदा घराबाहेर जाण्यासाठी आणखी एक खेळ खेळण्यात आला. उरलेल्या तीन सदस्यांना तीन दरवाज्यांसमोर उभं राहण्यास सांगण्यात आलं आणि ज्याच्या समोरील दरवाजा उघडेल तो सदस्य घराबाहेर होईल. यावेळेस किरण यांच्या समोरील दरवाजा उघडला आणि ते घराबाहेर आले. त्यानंतर घरातील उरलेले दोन सदस्य अपूर्वा आणि अक्षय लाईट बंद करून बाहेर आले होते आणि महेश सरांनी अपूर्वा आणि अक्षय यांना स्टेजवर बोलावलं आणि विजेत्याचं नाव घोषित केलं.


या महाअंतिम सोहळ्यात टॉप ५ स्पर्धकांसह याआधी बाहेर पडलेल्या स्पर्धकांचेही धमाकेदार परफॉरमन्स पाहायला मिळाले. कलर्स मराठीवर सुरू होत असलेल्या’रमा-राघव’ ह्या नवीन मालिकेतील, रमा आणि राघव यांनीही या कार्यक्रमात परफॉर्मन्स दिला.





Source link

Exit mobile version