Site icon CineShout

चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना उर्फीची जीभ घसरली, या राजकारण्यांना आता…

चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना उर्फीची जीभ घसरली, या राजकारण्यांना आता…


मुंबई: सार्वजनीक ठिकाणी वावरताना अतरंगी कपडे घालून अगंप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी जोर धरताना दिसतेय. यापूर्वी तिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्या होत्या. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे.

उर्फीचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ ट्विट करत ‘नंगटपणा करणारी बाई’ म्हणत चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका केली आहे. मुंबई पोलिसांना टॅग करत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, ‘शी…SSSS, अरे… हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तत्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडं निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवत आहे’. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांच्या ट्विटला आता उर्फीनं उत्तर दिलं आहे.
उर्फीनं तिच्या तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की…
असल्या राजकारण्यांकडं पाहून वाईट वाटतं. चर्चेत येण्यासाठी मला टार्गेट करतात. बलात्कारसाठी माझ्या कपड्यांना दोष देतातत. खूप सोपं आहे हे. नेहमी पिडितेचे कपडेच दिसतात. आणखीही मुद्दे आहेत, बेरोजगारी, बलात्काराचे लाखो खटले प्रलंबित आहे. याचं का? असं उर्फीनं वाघ यांना विचारलंय.

उर्फी पुढं म्हणते की, तुमच्या सारख्या राजकारणी नेत्या, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. ज्या महिलांना तुमच्या मदतीची खरंच गरज असते, त्यांच्यासाठी तुम्ही काही करत का नाही. महिलांच शिक्षण, बलात्काराच्या खटले, यांच्याकडं लक्ष का दे नाही, असा सवालही तिनं केलाय.
उर्फीनं नुकत्याच इन्स्टा स्टोरी शेअर केल्यात. चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना तिची जीभ घसरली असल्यानं तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

मला या कायद्याच्या कचाट्यात पडायचं नाहीये, मी तुरुंगात जायलाही तयार आहे. फक्त तुम्ही तुमची संपत्ती जाहीर करून टाका. तुम्ही राजकराणी किती आणि कसं कमवता ते एकदा जगाला कळू द्या. तुमच्या पक्षात अनेक नेत्यांवर बलात्काराचे , विनयभंगाचे आरोप केले गेलेत, त्यासाठी तुम्ही काही केल्याचं दिसलं नाही चित्रा वाघ.

नवीन वर्षात आणखी एका नेत्याकडून पोलिसात तक्रार, या नेत्याकडं , वकिलांकडं दुसरी काही कामं नाहीत का? संविधानात असं कोणतंच कलम नाही की, हे लोक मला तुरुंगात टाकू शकतात. अश्लीलतेची व्याख्या प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते. स्तनाग्र आणि योनी दिसत नाही तोपर्यंत मला आत टाकू शकत नाहीत. या लोकांना फक्त मीडियाचं अटेंशन हवंय. माझ्याकडं तुमच्यासाठी याहून चांगल्या कल्पना आहेत चित्रा वाघ.

मानव तस्करी, सेक्स रॅकेट्स याच्या विरोधात काही केलं तर, खूप काही आहे करण्यासारखं. अवैध डान्सबार सुरू आहेत, त्याचं काय? अख्ख्या मुंबईत अवैध वेश्या व्यवसाय सुरू आहे, त्याचं काय?, असं उर्फीनं म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांना पत्र
उर्फीवर योग्य कारवाई करण्यात यावी यासाठी चित्रा वाघ यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली आहे. वाघ यांनी एक पत्र पोलिसांना दिलं आहे.

चित्र वाघ यांनी पत्रात असं म्हटलं आहे की
उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा. उर्फी जावेद या अभिनेत्रीनं भर रस्त्यात आपल्या देहाचं केलेलं प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा ठरतोय. घटनेनं दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचं असं मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणं प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे.’ असं वाघ यांनी म्हटलं आहे.



Source link

Exit mobile version