वेड सिनेमामुळे जिनिलियाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने लग्नाच्यावेळी लोकांनी तिला रितेशशी लग्न न करण्याचा सल्ला दिल्याचं तिने यात सांगितलं. जिनिलियाने सांगितलं की, त्यावेळी लोक तिच्याकडे जायचे आणि सांगायचे की रितेशशी लग्न केलं तर तिचं फिल्मी करिअर पूर्णपणे संपून जाईल. या सगळ्यात जिनिलियाने लोकांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही कारण ती रितेशच्या आकंठ प्रेमात होती आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं.
दरम्यान, रितेश आणि जिनिलियाने हिंदी सिनेमांमध्ये एकत्र पदार्पण केलं होतं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुझे मेरी कसम’ हा दोघांचा पहिला सिनेमा होता. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करू लागले. १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत.
वेड सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ सिनेमा दिवसेंदिवस नवे रेकॉर्ड करत आहे. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत ३५ कोटींची कमाई केली आहे. ११ व्या दिवशी या सिनेमाने २.३५ कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे ‘वेड’ने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमाचाही एक रेकॉर्ड मोडला आहे. दुसऱ्या रविवारी ‘वेड’ने ५.७० कोटींची कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार सैराटची सर्वाधिक कमाई ४.६१ कोटींची होती. मंजुळेंच्या सैराटने सिनेमानेही दुसऱ्या रविवारीच ही सर्वात जास्त कमाई केली होती.