Site icon CineShout

भारतात काम करत या पाकिस्तानी कलाकारांनी केलेली तगडी कमाई; शाहरुखची अभिनेत्रीही आहे यादीत

भारतात काम करत या पाकिस्तानी कलाकारांनी केलेली तगडी कमाई; शाहरुखची अभिनेत्रीही आहे यादीत


Pakistani Actors Who Worked in Bollywood Industry: फवाद खान स्टारर पाकिस्तानी सिनेमा ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ची सध्या भारतात विशेष चर्चा आहे. या सिनेमा १३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर आता भारतातही हा सिनेमा दाखवला जाईल, असे बोलले जाते आहे. मात्र भारतात प्रेक्षकांकडून आणि पक्षांकडून या पाकिस्तानी सिनेमाला विरोध होतोय. महाराष्ट्रात मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. फवादच्या या सिनेमाविरोधात मनसेने भूमिका जाहीर केली. दरम्यान हे पहिल्यांदाच घडत नाहीये की पाकिस्तानी कलाकारांची चर्चा भारतात होते आहे. याआधीही अनेक पाकिस्तानी कलाकारांची भारतात चर्चा झाली आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करत घसघशीत कमाईही केली. जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?

​फवाद खान

या यादीत फवादचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. फवादचा मोठा चाहतावर्ग जगभरात आहे. ‘खूबसुरत’ सिनेमातून त्याने बॉलिवूड डेब्यू केलेला. ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘कपूर अँड सन्स’सारख्या बॉलिवूड सिनेमात तो दिसला होता. शिवाय त्याची ‘जिंदगी गुलजार है’ ही पाकिस्तानी मालिका भारतीय प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होती. ज्या ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ची सध्या चर्चा सुरू आहे या सिनेमातही फवाद मुख्य भूमिकेत आहे.

​माहिरा खान

‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या सिनेमात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री माहिरा खान हिनेही भारतात काम करत लोकप्रियता आणि संपत्ती कमावली. तिने ‘रईस’ या शाहरुख खान स्टारर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माहिरा खान हा पाकिस्तानी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. ‘हमसफर’ आणि ‘सदके तुम्हारे’ या तिच्या काही लोकप्रिय मालिका. रणबीर कपूरसोबत नाव जोडले गेल्यानेही माहिरा खान चर्चेत होती.

​इम्रान अब्बास नक्वी

पाकिस्तानात इम्रान अब्बास नक्वी या अभिनेत्याचे नाव घराघरात पोहोचले आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बिपाशा बासूसोबत काम केले असून ‘क्रिएचर’ सिनेमाने त्याला बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करून दिली. बिपाशासोबतचे त्याचे ‘मोहब्बत बरसा दे ना’ हे गाणं विशेष लोकप्रिय झाले होते. ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमातही इम्रानने रणबीर-अनुष्कासोबत स्क्रिन शेअर केली होती. पाकिस्तानात तो ‘तुम कौन पिया’, ‘खुदा आणि मोहब्बत’, ‘अमानत’ या मालिकांसाठी लोकप्रिय आहे.

​अतिफ अस्लम

बॉलिवूडमधील संगीत विश्वात एकापेक्षा एक हिट गाणी देणाऱ्या गायकांच्या यादीत अतिफ अस्लमचे नाव घ्यावेच लागेल. ‘तू जाने ना’, ‘तेरे लिये’, ‘पहली नजर मै’ अशी कित्येक गाणी अतिफच्या नावावर आहे. दरम्यान भारतात गात असताना अतिफ अनेकदा वादांमध्येही अडकला. बॉलिवूडमध्ये त्यांने विशेष लोकप्रियता जरी मिळवली असली तरी या वादांमुळे त्याच्यावर भारतात टीकाही तेवढीच झाली. पाकिस्तानमधील लोकप्रिय ‘जल’ बँडमधून त्याने करिअरला सुरुवात केलेली.

​अली जफर

अली जफर या पाकिस्तानी अभिनेता-गायकानेही भारतातील सिनेमांमध्ये काम करत तगडी कमाई केली आहे. त्याने संगीत आणि अभिनय दोन्ही क्षेत्र गाजवली. ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चष्मेबद्दुर’, ‘किल दिल’, ‘टोटल सियापा’ असे विविध सिनेमे त्याने बॉलिवूडमध्ये केले. या सिनेमातील काही गाणीही त्याच्या नावावर आहेत. कतरिना कैफसोबतचे त्याचे ‘मधुबाला’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरले. अलीकडेच इन्स्टाग्रामवर ट्रेंड होणाऱ्या ‘मैने तुझे देखा…’ या अलीच्या गाण्याने अक्षरश: चाहत्यांना वेड लावले होते.

​मावरा हुसैन

‘सनम तेरी कसम’ सिनेमात साधाभोळ्या मुलीची भूमिका करून मावरा हुसैन भारतात विशेष लोकप्रिय झाली. या सिनेमातील गाणीही भारतीय प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली आहेत. ‘किस्सा मेहरबानों’ आणि ‘सबात’ यासारख्या मालिकांमधून मावराने पाकिस्तान आणि भारतात चाहतावर्ग कमावला. सोशल मीडियावरही मावराची तगडी फॅन फॉलोइंग आहे. तिची बहीण उर्वा हुसैनही पाकिस्तानी टेलिव्हिजन विश्वाल लोकप्रिय आहे.



Source link

Exit mobile version