Site icon CineShout

‘रानबाजार’पेक्षाही बोल्ड सीन,

‘रानबाजार’पेक्षाही बोल्ड सीन,


जयंत पवार दिग्दर्शित’अथांग’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी वेबसीरिजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितली जाणारी ही पहिली वेबसीरिज ठरली आहे. एका वाड्याभोवती फिरणारी ही कथा आहे. या रहस्यमय वाड्यात अनेक गुपिते दडलेली असून एक एक करून ती समोर येतात. वेबसीरिजमधील एक प्रेमगीतही नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘खुलते इथे कळी’ असे या सुमधूर गाण्याचे बोल असून हे गाणं शरयू दाते आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहित राऊतनं संगीत दिलं आहे.

तेजस्विनी पंडित आहे निर्माती

‘अथांग’ या वेबसीरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी – सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.

पिरिॲाडिक काळ

अथांग या वेबसीरिजचे शेवटचे दोन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. या आधी प्रदर्शित झालेल्या एपिसोड्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. प्रेक्षकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. पिरिॲाडिक काळ दाखवणं कठीण काम आहे, मात्र ‘अथांग’च्या संपूर्ण टीमनं हे आव्हान पेलले आणि यशस्वीही केलं, असं निर्माते सांगतात.

​बोल्ड विषय

सीरिजचा विषय जुन्या काळातला असला तरी, बोल्डनेसचा तडका विषयात आणि सीन्समध्येही पाहायला मिळतोय.दिग्दर्शक जयंत पवार म्हणतात, ‘अथांग ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे, हे पाहून समाधान वाटतंय. प्लॅनेट मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. तो यशस्वी होताना दिसतोय. सहा भागांत प्रदर्शित करण्यात आलेली ही वेबसीरिज क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

​पहिलीच वेब सीरिज

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतकं रेकॅार्ड ब्रेकिंग यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहिली होती. निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न. ट्रेलरमध्ये शेवटी एक लहान मुलगा, ”आई अळवत म्हणजे काय?” असा प्रश्न विचारतो. सरदेशमुखांच्या कुटुंबाचा आणि त्या अळवतीचा काय संबंध, हे ‘अथांग’ पाहिल्यावरच उलगडतं. थरार, रहस्यानं भरलेली सीरिज सध्या चर्चेत आली आहे.



Source link

Exit mobile version