Site icon CineShout

सेक्युलर राष्ट्राच्या सेक्युलर जनतेला काहीच अडचण नाही… ख्रिसमस सेलिब्रेशनवर केतकी चितळेचा टोमणा

सेक्युलर राष्ट्राच्या सेक्युलर जनतेला काहीच अडचण नाही… ख्रिसमस सेलिब्रेशनवर केतकी चितळेचा टोमणा



मुंबई: सध्या जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतो आहे. भारतातही मोठ्या उत्साहाने ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. नाताळच्या या सणादरम्यान अभिनेत्री केतकी चितळेची एक पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने या सणाच्या निमित्तांने पर्यावरणवादींवर टीका केली. या काळात झाडं कापली जातात, यामुळे पर्यावरणवाद्यांना काही समस्या नसते अशी टीका केतकीने केली आहे.

काय म्हणाली केतकी चितळे?

जगभरात ख्रिसमसची लगबग सुरू असताना केतकीने इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. तिने या स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, ‘जगभरातील लोकांनो ऐका.. सगळे पर्यावरणवादी झोपले आहेत बघा. केवळ डिसेंबरमध्ये १२० मिलियन झाडांच्या कत्तली झाल्या आणि २-३ बिलियनने कार्बन फुटप्रिंट्स वाढल्या. पण हा तर सण आहे मग आम्ही काही बोलणार आहे. झाडं कापण्याबरोबरच फटाकेही फोडू. सेक्युलर राष्ट्राच्या सेक्युलर जनतेला याबाबत काहीच अडचण नाही आहे.- केतकी चितळे’.

हे वाचा-विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत का भडकले शरद पोंक्षे

अभिनेत्रीची ही उपहासात्मक पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. या सर्व पोस्टचा रोख पर्यावरणवाद्यांवर आहे. दिवाळी सणादरम्यान फटाके न फोडण्याचा सल्ला दिला जातो, अशा पर्यावरणवाद्यांना केतकीने लक्ष्य केले. नाताळदरम्यान झाडांच्या कत्तली होतात, फटाके फोडले जातात त्यावर कोणीच काही कसं बोलत नाही, अशा आशयाचा सवाल केतकीला विचारायचा असावा. पण तसं थेट न लिहिता अभिनेत्रीने उपहासात्मक पोस्ट केली आहे. दरम्यान अशी उपहासात्मक पोस्ट करूनही तिने ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. तर या पोस्टच्या शेवटी तिने #Jaago_Mere_Desh असा हॅशटॅगही वापरला आहे.

केतकीची ही पहिलीच पोस्ट नव्हे जी चर्चेत आली आहे. याहीआधी तिने अनेक मुद्द्यांवर परखड मत मांडले आहे. काही दिवसांपूर्वी केतकी चर्चेत आलेली, जेव्हा तिने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य केले होते. नागपुरात बोलताना अमृता म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत.

हे वाचा-प्रेग्नंट असल्यामुळे देवोलीनाने गुपचूप उरकलं शाहनवाजशी लग्न? स्पष्टच बोलली अभिनेत्री

‘सध्या जुने आणि नवीन आदर्श असा वाद सुरू आहे. जुने , नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना झालाय. प्रत्येक दिवसागणिक भारत बदलतोय आणि हिच ती वेळ आहे की आपण आता स्वत:ही बदलायला हवं. आणखी एक म्हणजे आता हे सत्य आपण स्वीकारायला पाहिजे की, गेल्या तीनशे वर्षांपूर्वीचा संदर्भ आता १०० वर्षांवर आला आहे’, अशी पोस्ट केतकीने केली होती.



Source link

Exit mobile version