Rakhi Sawant Wedding: राखी सावंतने पुन्हा एकदा केलं लग्न, गळ्यात वरमाला घातलेला फोटो होतोय व्हायरल


मुंबई: अभिनेत्री राखी सावंतबाबत कधी काय बातमी समोर येईल याचा अंदाज बांधणं तसं कठीणच आहे! आता तिच्या आयुष्यातील एक खूप मोठे अपडेट समोर आले असून तिचे फोटोही व्हायरल झालेत. अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीशी लग्न केले आहे. त्यांचे गळ्यामध्ये वरमाला घातलेले फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचे विवाह प्रमाणपत्रासोबतही त्यांनी पोज दिली, याशिवाय या सर्टिफिकेटवर सही करतानाचाही फोटो समोर आला आहे. ही बातमी मिळताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे, मात्र अद्याप राखी किंवा आदिल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये राखी सावंत भारतीय पोषाखामध्ये दिसली. तिच्या आणि आदिलच्या गळ्यात वरमाला आहे आणि त्यांनी मॅरेज सर्टिफिकेटसोबतही फोटो काढला आहे.

हे वाचा-पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय शाहरुखचा लेक? सादिया खानने स्वत:च केला खुलासा

प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करताना दिसली राखी

राखीचा आणखी एक फोटो व्हायरल होतोय ज्यात ती एका कागदपत्रावर सही करत आहे. असे बोलले जात आहे की हे आदिल-राखीचे विवाह प्रमाणपत्र आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला आदिल बसला आहे. तर संबंधित कागदपत्रावर राखी आणि आदिल यांचा फोटोही दिसतो आहे.

गेल्यावर्षीच उरकलेलं लग्नं?

सोशल मीडियावर राखी आणि आदिलशी संबंधित हे डॉक्युमेंट व्हायरल झाले असून यावर दोघांचा फोटो आहे. दरम्यान या कागदपत्रावर लग्नाची तारीख २९ मे २०२२ अशी दिसते आहे, तर आणखी एक नोंदणीची तारीख दिसते असून ती २ जुलै २०२२ आहे. आता अशी चर्चा रंगलीये की राखी-आदिलने गेल्यावर्षीच लग्नसोहळा उरकला.

rakhi adil marriage certificate

रितेशशी नातं बिनसल्यानंतर आदिलला करतेय डेट

राखीने २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशसोबत लग्न केलेले. दोघे रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही दिसले होते, पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली. राखी जवळपास रोज आदिलसोबत पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते.


हे वाचा-RRR चा परदेशात डंका! ‘नाटू नाटू’ गाण्याने जिंकला मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार

दरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास राखी अलीकडेच बिग बॉसच्या मराठी ४ मध्ये दिसली होती. ती या कार्यक्रमात टॉप ५ पर्यंतही पोहोचलेली. मात्र या टप्प्यावर तिने ९ लाख रुपये निवडत स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Source link

Leave a Reply