Site icon CineShout

पद्मश्री का दिला जातोय हेही आईला आठवत नव्हते… सुलोचना चव्हाणांच्या निधनानंतर मुलाने व्यक्त केली खंत

पद्मश्री का दिला जातोय हेही आईला आठवत नव्हते… सुलोचना चव्हाणांच्या निधनानंतर मुलाने व्यक्त केली खंत


मुंबई: लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला. १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. सुलोचना चव्हाण अर्थात सर्वांच्या लाडक्या ‘माई’ त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या गायनाने महाराष्ट्राच्या लावणीला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिलेली, आज हा दैवी आवाज हरपला. अवघा महाराष्ट्र त्यांच्या अशा अचानक जाण्याने शोक व्यक्त करत आहे. दरम्यान सुलोचना चव्हाण यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी एक खंत व्यक्त केली असून आईच्या जाण्याने ते पुरते कोलमडून गेलेत. सुलोचना यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

काय म्हणाले विजय चव्हाण?

विजय चव्हाण यांनी आईविषयी बोलताना असे म्हटले की, ‘माझी आई माझी गुरू होती. आज ती मला सोडून गेली. लावणीकडे ज्या वक्रदृष्टीने पाहिलं जायचं, तो दृष्टिकोन आईमुळे बदलला. फडावरची लावणी घराघरात पोहोचवून तिने लावणीला मान मिळवून दिला.’

हे वाचा-आता त्यांचा आवाज, सूर याच माझ्यासाठी मोठ्या आठवणी; अशोक सराफ भावुक

सुलोचना यांच्या मुलाने आईच्या निधनानंतर एक खंतही व्यक्त केली. ते प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले की, ‘सरकारने आईला पद्मश्री दिला, पण एकाच गोष्टीची खंत वाटते की असे पुरस्कार कलाकाराला योग्य वयात मिळायला हवेत. जेव्हा आईला हा पुरस्कार मिळाला तेव्हा आईची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. हा पुरस्कार कशासाठी आणि कोणाकडून मिळतोय हेही आठवत नव्हतं, ही मोठी खंत आहे. येत्या काळात कलाकारांचा योग्य सन्मान होईल एवढीच भावना व्यक्त करतो.’

हे वाचा-आईच्या निधनाच्या दुसऱ्याचं दिवशी गायला उभ्या राहिलेल्या सुलोचना चव्हाण

वृद्धापकाळानुसार सुलोचना यांची स्मृती कमी झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला. यंदाच्या २०२२ च्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरुन पोहोचल्या होत्या. उमेदीच्या काळात गाण्यांसाठी अवघा देश पालथा घातलेल्या सुलोचना चव्हाण यांना अशाप्रकारे पाहून त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केलेली.

डावीकडून ढोलकीवादक कृष्णा मुसळे, विजय चव्हाण (सुलोचना चव्हाण यांचा मुलगा), स्वत: सुलोचना चव्हाण आणि गायिका वैशाली सामंत.

४ वाजता होणार अखेरच्या प्रवासाला सुरुवात

सुलोचना यांनी १० डिसेंबर रोजी १२ वाजता फणसवाडी याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फणसवाडीतील लीला तारा टॉवर्समध्ये त्या राहत होत्या, इथूनच दुपारी ४ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. या परिसराती मंडळी त्यांना ‘माई’ म्हणूनच ओळखत असत. माईंच्या निधनानंतर शोक व्यक्त करणारे फलक फणसवाडी परिसरात लावण्यात आलेत.



Source link

Exit mobile version