Bigg Boss 16: मन जिकलं पण शो हरणार शिव ठाकरे? प्रेक्षकांनाही स्पष्ट दिसतायंत ही कारणं


Shiv Thakare in Bigg Boss 16: बिग बॉसचे १६ वे पर्वही आधीप्रमाणेच सुपरहिट ठरते आहे. या पर्वातील विविध स्पर्धकांची जरी कुप्रसिद्धी होत असली तरी ते चर्चेत आहेत एवढं मात्र नक्की! जेव्हा हा सीझन सुरू झाला तेव्हा असे वाटले नव्हते की हे पर्व एवढे गाजेल. मात्र बिग बॉस १६नेही कमाल केली. या पर्वात प्रियांका चाहर, अर्चना गौतम, अब्दू रोजिक, शालिन भनोट, साजिद खान, एमसी स्टॅन हे स्पर्धक विविध वादांमुळे पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये एक मराठी नावही प्रेक्षकांकडून कौतुक मिळवत आहे- हा स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे! मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व जिंकल्यानंतर शिवने एक मोठा चाहतावर्ग कमावला. या एक तगड्या फॅन फॉलोइंगसह शिव बिग बॉस १६ मध्ये पोहोचला होता. पण आता शिवबाबत एक वेगळी चर्चा रंगली आहे.

​कापले जातात शिवचे सीन?

शिवच्या चाहत्यांनी यापूर्वीही सोशल मीडियावर हा मुद्दा मांडला होता की, शिव ठाकरेंचे सीन कापले जातात. हे सीन टीव्हीवर दाखवले जात नाहीत. जान्हवी कपूर जेव्हा तिच्या ‘मिली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात आलेली तेव्हा एक टास्क होता. शिवनेही हा टास्क पूर्ण केलेला, पण त्याचे फुटेज कधीच टीव्हीवर दाखवले गेले नाही. त्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर शिवच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केलेला.

​शिवला कमी संधी मिळते?

अलीकडच्या एपिसोडबद्दल सांगायचे झाले तर, सकाळीच एक टास्क खेळवण्यात आला. ज्यात घरातील सदस्यांना त्यांच्याबद्दल काय बोलले गेले आहे हे सांगण्यात आले. टास्क असा होता की त्यांना अंदाज लावयचा होता की ते कुणी बोलले असेल आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिखलफेक करायची. या टास्कमध्ये टीना दत्ता, निमृत कौर अहलुवालिया, सौंदर्या शर्मा या सर्वांना संधी मिळाली. मात्र शिवला एकदाही संधी दिली गेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीनाला एक-दोन नव्हे तर अनेक चान्स मिळाले, निमृतलाही अनेक संधी मिळाल्या, पण शिवचा नंबर एकदाही आला नाही.

​’वीकेंड का वार’मध्ये होत नाही चर्चा

जेव्हा शिव ठाकरे आणि अर्चना गौतममध्ये ‘गळा पकडण्या’वरून भांडण झालेले तेव्हा होस्ट सलमान खानने शिवशी बातचीत केली. त्यानंतर दोन वेळा ‘वीकेंड का वार’चा एपिसोड आला. पण सलमान आणि शिवमध्ये क्वचित बोलणे झाले. प्रत्येक वेळी प्रियंका चहर चौधरी, टीना दत्ता, शालीन भनोट, साजिद खान, अर्चना गौतम किंवा अंकित गुप्ता यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चे होते. तर अलीकडच्या ‘फ्रायडे का वार’मध्ये शिवला कोणतीच गोष्ट विचारली गेली नाही. एकंदरीत, शिवला ‘वीकेंड का वार’मध्ये कोणतेही हायलाइट्स मिळत नाहीत. इतर सदस्यांना काही ना काहीतरी विचारले जातेच!

​एपिसोडमध्येही असतात कमी क्लिप्स

हा शो Voot अॅपवर २४ तास पाहता येतो. याशिवाय तुम्ही ‘एक्स्ट्रा मसाला’ आणि ‘अनदेखे सीन्स’ही याठिकाणी पाहू शकता. या व्यतिरिक्त सोशल मीडियावर कोणता ना कोणता स्पर्धक कायम ट्रेंड होत असतो. शिवची तर सोशल मीडियावर हवा आहे. ट्विटरवर तो कायम चर्चेत राहिला आहे, असे असताना टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या एपिसोडमध्ये त्याला क्वचितच दाखवले जाते. असेही म्हटले जाते आहे की शिव भांडत नाही त्यामुळे त्याला कदाचित कमी दाखवले जाते. पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. चाहत्यांना या स्पर्धेतील शिव हा ‘रिअल’ स्पर्धक असल्याचे वाटते.

​शिवला फ्लॉप करण्याचा होतोय प्रयत्न?

सोशल मीडियावर शिव हिट आहे, असा कोणताही दिवस नाही ज्यादिवशी तो ट्रेंड होत नाही. मग ते अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅनला पाठिंबा देणं असो किंवा एकट्या पडलेल्या सुंबुलची काळजी घेणं असो… निमृतवर विश्वास ठेवून संधी देणं असो किंवा साजिद खानचा राग शांत करणं… शिव प्रियंका चाहर चौधरी आणि अर्चना गौतम यांच्यासोबतही उभा राहिला होता. शिवच्या या गोष्टी चाहत्यांना खूप आवडतात. त्यामुळे असा सवाल उपस्थित केला जातोय की, हिट होऊनही त्याला टीव्हीवर कमी का दाखवले जाते, त्याला फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला जातोय का?

​हिंदी टीव्हीचा चेहरा नसल्याने होतोय अन्याय?

असाही सवाल निर्माण होतोय की शिवसोबत असा भेदभाव का केला जात आहे? तो हिंदी टीव्हीचा चेहरा नाही त्यामुळे त्याला अशी वागणूक दिली जात आहे का? काही प्रेक्षकांचे असे मत आहे की, निमृत कौर अहलुवालिया असो किंवा टीना दत्ता, या सर्व अभिनेत्रींनी टीव्हीवर काम केले आहे. त्यामुळे त्यांना अधिक फुटेज दिले जाकते. असेही बोलले जात आहे की, चॅनललाही अशाप्रकारे एखाद्या ‘चेहऱ्या’ने हा शो जिंकलेले पाहायचे आहे, म्हणून निर्माते जाणूनबुजून शिवला कमी दाखवत आहेत. आता ही सर्व चर्चा होणारी कारणं कितपत खरी आहेत, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply