अश्लील व्हिडिओचा वाद सुरू असतानाच राम गोपाल वर्मांनी शेअर केला अप्सरा राणीसोबतचा ‘तो’ फोटो


दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ( Ram Gopal Varma ) यांच्या अश्लील व्हिडिओमुळं वातावरण तापलं आहे. अभिनेत्रीसोबत अतिशय आक्षेपार्ह असा व्हिडिओ त्यांनी ट्विट केल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे, हा वाद निवळलाही नाही, तो पर्यंत राम गोपाल वर्मांनी आणखी एक फोटो शेअर केलाय.

राम गोपाल वर्मा आणि वाद

राम गोपाल वर्मा आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. वादग्रस्त व्हिडिओ, ट्विट आणि वक्तव्य यामुळं ते अनेकदा चर्चेत आलेत, आणि वादातही अडकले आहेत. अतिशय बोल्ड चित्रपटांच दिग्दर्शन करणारे राम गोपाल वर्मा गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. ‘रंगीला’, ‘कंपनी’, ‘सत्या’, आणि ‘सरकार’ असे अनेक दमादर चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा काही वर्षापासून बॉलिवूडपासून दूर असले तर सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय असतात.

अश्लीलतेचा कळस

राम गोपाल वर्मांनी शेअर केलेल्या व्हिडिओत ते अभिनेत्रीसोबत अतिशय अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केलाय. या व्हिडिओत राम गोपाल वर्मांसोबत ‘डेंजरस’ या चित्रपटाची अभिनेत्री आशु रेड्डी दिसत आहे. व्हिडिओत राम गोपाल वर्मा जमिनीवर बसलेले आहेत तर अभिनेत्री सोफ्यावर बसली आहे. ‘डेंजरस’ या चित्रपटाबद्दल दोघंही बोलताना दिसतायत. पण नंतर असं काही घडतं की, बघणाऱ्याला लाज वाटत आहे. रामू आधी तिच्या पायला किस करतात तर नंतर तिचे पाय चाटताना दिसतात.

अप्सरा राणी

या व्हिडिओचा वाद सुरू असतानाच रामू गोपाल वर्मा यांनी आणखी एका अभिनेत्रीसोबत फोटो शेअर केला आहे. राम यांनी पुन्हा एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी अभिनेत्री अप्सरा राणी सोबत फोटो शेअर केलाय. अभिनेत्रीनं चिता प्रिन्ट असलेला बोल्ड ड्रेस घातलाय. तर राम गोपाल वर्मांनी तिच्या करमेत हात घालून फोटो काढलाय. या फोटोवरही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केलं आहे.

आशू रेड्डी आहे तरी कोण?

रामूंच्या व्हिडिओत दिसणारी आशू रेड्डी नेमकी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. ती डल्लास इथं राहणारी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे, शिवाय ती अभिनेत्रीही आहे. इन्स्टाग्रामवर आशूचे १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती कायम तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या हॉट अंदाजातील फोटोंवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत असतात. आशु तेलुगू सिनेमाविश्वात प्रसिद्ध आहे. ती अनेकदा तिच्या चॅनेलवर राम गोपाल वर्मा यांच्याबरोबरचे व्हिडिओ शेअर करत असते. आशुला दाक्षिणात्य सिनेमाविश्वात ज्युनिअर सामंथा म्हणूनही ओळखलं जाते. तसंच ती टीव्हीवर अनेक कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन देखील करते.



Source link

Leave a Reply