साजिद खानची ‘बिग बॉस १६’ मेकर्ससह झालेल्या एका कराराची मोठी माहिती समोर आली आहे. पहिल्या दिवसापासून साजिद खानला ‘बिग बॉस १६’ मधून बाहेर काढण्याची मागणी करणाऱ्यांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो.
हेही वाचा – बेशरम रंग गाण्यावरुन वाद; दीपिकाची केशरी बिकिनी कोणी डिझाइन केली?
नॉमिनेट होऊनही, बेघर होण्यापासून होतोय बचाव
‘बिग बॉस १६’ सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन ते तीन वेळा साजिद नॉमिनेट झाला आहे. पण ज्यावेळी तो नॉमिनेट होतो, त्यावेळी टास्क किंवा इतर काही गोष्टी अशा डिझाइन केल्या जातात की साजिद खान बेघर होण्यापासून वाचतो. शोमधून आतापर्यंत अनेक चांगले स्पर्धक बेघर झाले, पण साजिद खान वादात असूनही टिकून आहे. यावेळीही साजिद खान नॉमिनेट झाला आणि वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या. सध्याची परिस्थिती साजिद विरोधात आहे आणि वोटिंग झालं, तर सर्वात कमी वोट साजिदला मिळतील आणि त्याला बेघर होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी वोटिंग लाइन्स बंद केल्याचा दावा करण्यात आला आहे.
साजिद खान इतक्या वेळा नॉमिनेट होऊनही कसा वाचतो? साजिदला ‘बिग बॉस १६’ मेकर्स का वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? प्रत्येक टास्क साजिदच्या बाजूने कसा होतो? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारले जात आहेत. बिग बॉस चाहत्यांनी याप्रकरणी मेकर्सवर दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. ‘बिग बॉस १६’ मधून साजिद बाहेर का जात नाही? त्याला का प्रत्येकवेळी वाचवलं जातं? याचं कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा – शाहरुख खान आणि दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज; ‘बेशरम’ गाण्याचा युट्यूबवर धुमाकुळ
१५ जानेवारी २०१३ पर्यंत बेघर होणार नाही, कॉन्ट्रॅक्टमध्ये डील?
‘बिग बॉस’संबंधित अपडेट देणाऱ्या ‘द खबरी’ने आपल्या सोशल मीडियावरुन असा दावा केला आहे, की साजिद खानचं बिग बॉसच्या मेकर्सशी एक कॉन्ट्रॅक्ट आहे. यात साजिदला ‘बिग बॉस १६’ मध्ये राहण्यासाठी १५ जानेवारी २०२३ पर्यंतची मिनिमम गॅरेंटी देण्यात आली आहे.
हेही वाचा – हे चुकीचं आहे, तेजस्विनीला परत घेऊन या अन्यथा… बिग बॉस मराठीच्या मेकर्सवर भडकले चाहते
जोपर्यंत साजिदचा बिग बॉसच्या घरातील १५ जानेवारीपर्यंतचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्याला बेघर केलं जाऊ शकत नाही किंवा शोमधून हाकलूनही दिलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच ‘बिग बॉस १६’चे निर्माते प्रत्येक वेळी साजिद खानला एलिमिनेशनपासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असा दावा करण्यात आला आहे.