मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीवर नागराजचं नाव घेत स्पष्टच बोलली तेजस्विनी पंडित


मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकली आहेतच सोबतच आपल्या आरस्पानी सौंदर्याने तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तेजस्विनीची ‘अथांग’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजस्विनी या वेबसीरिजची निर्माती आहे. तिने यात कोणतीही भूमिका साकारली नसली तरी वेबसीरिजसाठी तिने पडद्यामागे अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

​अभिनेत्री ते निर्माती

मराठी अभिनेत्रींना मानधन कमी मिळत असलं , त्या निर्मिती क्षेत्रात उतरताना दिसतायत. तेजस्विनीनं नेहमीच अभिनेत्रींना मिळणाऱ्या कमी मानधनावर भाष्य केलंय. निर्माती होण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाच्या जोरावर न होता, त्यासाठी अनेक दुसरे पर्याय असतात. वेगवेगळ्या माध्यमातून पैसा उभा करता येतो. सिनेमासाठी असणाऱ्या पॅशनसाठी स्वत:ची बचतही यात आहेत. तर आपल्या खिशातले सगळेच पैसे टाकायचे नाहीत, असं तेजस्विनी म्हणाली. तसंच योग्य वयात हा निर्णय घेतल्याचंही तिनं सांगितलं. मला तोटा झाला तरी, ते भरून काढण्यासाठी मला संधी मिळेल, माझ्याकडं वेळ असेल असंही तेजस्विनी म्हणाली.

​मराठी सिनेसृष्टीत गटबाजी?

बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे आपल्याला माहितच आहे. पण मराठी सिनेसृष्टीतील कंपूशाही, गटबाजीवर तेजस्विनीनं भाष्य केलंय. गेल्या काही वर्षांत तेजस्विनी ठरलेल्या लोकांसोबतच काम करत आहे असं म्हटलं जात होतं. तिच टीम, तेच कलाकार असं समिकरण झालं होतं. यावर तेजस्विनी स्पष्टच बोलली. संजय जाधव यांच्याच सोबत ती काम करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर ती म्हणाली की, दिग्दर्शकाला काही ठरलेल्या कलाकारांसोबत काम करणं सोपं जातं. मराठी सिनेसृष्टीतही गटबाजी दिसून येतेय का? यावर बोलताना तेजस्विनी म्हणाली की, नागराजही आकाश ठोसरला त्याच्या चित्रपटांमध्ये घेतोच की, असं नाही की, फक्त संजय जाधवच कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे, असं ती म्हणाली.

​कास्टिंग काऊच

मराठी सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचबद्दल तेजस्विनीनं खुलासा केला. इंडस्ट्रीत असे काही अनुभव आले नसल्याचं तिनं सांगितलं. पण इंडस्ट्रीबाहेरचा एक अनुभव तेजस्विनीनं शेअर केला. या क्षेत्रात नवीन असताना पुण्यातील एका नगरसेवकानं तिच्याकडं नको ती मागणी केली होती, असं तिनं सांगितलं. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टवर मुलाखत देत असताना तेजस्विनीनं नगरसेवकाचे नाव घेण्याचं टाळत त्यानं केलेल्या निर्लज्ज ऑफरविषयी सांगितलं. त्याची सध्या चर्चा सुरू आहे.

​’दुनियादारी’माझी होती

तेजस्विनीनं मोजक्या भूमिकाच केल्या असल्या तरी त्या मोजक्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण तिला ऑफर झालेल्या अनेक भूमिका अचानक दुसऱ्या अभिनेत्रींना देण्यात आल्या, असे काही किस्सेही तिनं शेअर केले. मराठी सिनेसृष्टीत गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘दुनियादारी’ या चित्रपटाचं नाव नेहमीच घेतलं जाईल. ‘दुनियादारी’ गाजला, तो म्हणजे यातल्या पात्रांमुळं आणि कलाकारांमुळं. सई ताम्हणकर हिनं सत्तरीच्या दशकातली शिरीन भूमिका साकारली होती. पण ही भूमिका आधी तेजस्विनीला ऑफर करण्यात आली होती. पण अचानक सईची निवड करण्यात आली, असं तिनं सांगितलं.



Source link

Leave a Reply