हृतासाठी गेलं वर्ष अतिशय छान गेलं. मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २०२१ रोजी हृता आणि प्रतीक शाह यांचा साखपुडा पार पडला होता. त्यानंतर तिने दोन चित्रपटात दोन वेगवगेळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. तिचे ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर याच वर्षी तिचं आणि प्रतीकचं लग्नदेखील झालं. सुट्ट्या घालवण्यासाठी ती प्रतिकसोबत तुर्कीला गेली होती. आता वर्षाअखेरीस ती पुन्हा एकदा कामातून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. तिथले अनेक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तिने दुबईतील उंच इमारतीमधील एक फोटो शेअर केलं आहे ज्यात दुबईचं सौंदर्य दिसतंय.
तर एका फोटोत ती आणि प्रतीक जेवण एन्जॉय करताना दिसतायत. त्यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. हृताच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २ मिलियनहुन अधिक फॉलोवर्स आहेत. चाहत्यांनीही तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. हृता लवकरच नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तिने एका चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. त्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत दिली होती. आता चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.