हेही वाचा – मलायकाला लवकरच करायचंय लग्न, पण अर्जुन कपूर नाही तर हे आहे खास कारण
ओरीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या पार्टीतील काही इनसाइट फोटो आपल्य इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो सलमान खानपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहारियासह पोज देताना दिसतो आहे. जान्हवी या पार्टीमध्ये गुलाबी रंगाची साडी नेसून पोहोचली होती. त्यावेळी शिखर पहारियाने तिचं गेटवर स्वागत केलं. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
हेही वाचा – सलमान खान नव्या वर्षात होस्ट नाही करणार बिग बॉस १६? हा सेलिब्रिटी करणार भाईजानला रिप्लेस
करण जौहरच्या शोमध्ये कबूल केली होती रिलेशनशिपची बाब
जान्हवी कपूर ‘कॉफी विद करण’च्या ७व्या सीजनमध्ये दिसली होती. त्यावेळी तिने शिखर पहारियासोबत रिलेशनशिपची बाब मान्य केली होती. त्यावेळी दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा – प्रेग्नन्सीमध्ये १४ वेळा अपयशी, प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे जुळ्यांची आई
जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया काही काळ रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. आता पुन्हा एकदा ज्याप्रमाणे दोघं अनंत अंबानी आणि राधिकाच्या पार्टीत दिसले त्यावरुन जान्हवी आणि शिखरचं पुन्हा एकदा पॅचअप झाल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरचे वडील आणि निर्माते बोनी कपूरदेखील शिखर पहारियासोबत दिसले होते. त्यावरुनही दोघं पुन्हा एकत्र आल्याची चर्चा आहे.
कोण आहे शिखर पहारिया?
शिखर पहारिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर पहारिया व्यवसायिक असून तो पोलो प्लेअरही आहे.
दरम्यान, जान्हवी २०२२ मध्ये ‘मिली’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पुढील वर्षी २०२३ मध्ये तिचे दोन चित्रपट ‘बवाल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ प्रदर्शित होणार आहे.