आम्ही हे सहन करणार नाही; हर हर महादेव चित्रपटावर स्वराज्य संघटनेचा निर्वाणीचा इशारा


मुंबई- ज्या दिवसापासून हर हर महादेव सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवसापासून सिनेमाविषयीची वाद थांबायचं नाव घेत नाहीत. सिनेमात अत्यंत चुकीचा इतिहास दाखवल्याचं बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी सांगितलं होतं. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीही टीव्हीवर सिनेमा प्रसारित करू नये असं वारंवार सांगितलं होतं.

संभाजीराजे यांनी झी स्टुडिओला याबद्दल इशाराही दिला होता. या वादात शेवटी झी स्टुडिओने माघार घेत १८ डिसेंबरला प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर स्वराज्य संघटनेने पुन्हा एक निवेदन शेअर केलं. यात संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी स्पष्ट केले की, १८ डिसेंबर रोजी स्वराज्यचे पदाधिकारी अंकुश कदम आणि विनोद साबळे यांनी झी स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष जाऊन सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये यासाठी संविधानिक मार्गाने इशारा दिला होता.

आता मात्र सिनेमातील वादग्रस्त भाग वगळून सिनेमा प्रसारित केला जाणार असल्याचं समजत आहे. ज्याअर्थी त्यांनी असा निर्णय घेतला, त्याअर्थी त्यांनी सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचं एकप्रकारे मान्यच केलं आहे. असं असलं तरी संपूर्ण सिनेमा प्रसारित करण्यावरच आमचा आक्षेप आहे.


नक्की का आहे वाद-

‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू यांच्यात लढाई दाखवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात असं कधीही झालं नसल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं होतं. त्यासोबतच जिजाई मातोश्री या बाजीप्रभूंचा उल्लेख श्रीरामास जसा हनुमंत असा करतात प्रत्यक्षात तो हनुमंतास जसा अंगद असा आहे.

यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान भेटीवेळी बाजीप्रभू तिथे उपस्थित नव्हते. मात्र चित्रपटात तसं दाखवण्यात आलं आहे. शिवाय महाराजांनी अफझलखानाचा वध हा हिरण्यकश्यपूप्रमाणे पोट फाडून केला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातील या दृश्यांवर संभाजीराजांनी आक्षेप घेतला होता.

शिवभक्तांचा आवाज तुमच्या कानठळ्या बसवेल, शिवरायांविषयी बोलतानाच माईक बंद केल्याने अमोल कोल्हेंचा संताप





Source link

Leave a Reply