काय म्हणाली केतकी?
सध्या जुने आणि नवीन आदर्श असा वाद सुरू आहे. जुने , नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना झालाय. प्रत्येक दिवसागणिक भारत बदलतोय आणि हिच ती वेळ आहे की आपण आता स्वत:ही बदलायला हवं. आणखी एक म्हणजे आता हे सत्य आपण स्वीकारायला पाहिजे की, गेल्या तीनशे वर्षांपूर्वीचा संदर्भ आता १०० वर्षांवर आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केतकीनं छत्रपती शिवाजी महाराजांवरही एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती . शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये केतकीनं समित्यांवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘समिती कुठली, कशासाठी आणि ती निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. महाराजांचं नाव घेऊन सनातन धर्माला मारणं हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्यानं काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावानं लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच.’ असं तिनं म्हटलं होतं.