गुरुचरित्राबाबत बोलायची लायकी नाही, शरीर दाखवणाऱ्यांनी… युजरच्या कमेंटवर काय म्हणाली अमृता खानविलकर?



मुंबई: अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सध्या व्यग्र आहे. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर विविध अपडेट्स शेअर करायला ती विसरत नाही. आगामी सिनेमा-सीरिज असो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट असो, अभिनेत्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. मात्र अनेकदा सेलिब्रिटींना सोशल मीडियावर असभ्य कमेंट्सचा सामना करावा लागतो, अमृतासोबतही असाच प्रकार घडला आहे. अमृताने शेअर केलेल्या एका पोस्टवर एका व्यक्तीची अश्लिल कमेंट सध्या व्हायरल होते आहे.

काय आहे अमृताची फेसबुक पोस्ट?

अमृताने गुरुवारी तिच्या फेसबुकवर गुरुचरित्रातील काही ओळी शेअर केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर हजारो लाइक्स आले असून चाहते ती गुरुचरित्र वाचत असल्याने तिचं कौतुकही करतायंत. या सर्वांदरम्यान अभिनेत्रीच्या कमेंट बॉक्समध्ये एका व्यक्तीच्या कमेंटची चर्चा होते आहे. या व्यक्तीने तिच्या ‘गुरुचरित्रा’च्या पोस्टवर असे म्हटले की, ‘गुरुचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची. शरीर दाखवणाऱ्यांनी याबाबत बोलू नये.’

हे वाचा-विराटशी खास कनेक्शन अन् रोहित शर्माही नातेवाईक, कोण आहे हा रियाचा बॉयफ्रेंड?

संबंधित युजरने असभ्य भाषेत केलेल्या कमेंटनंतर अमृतासह तिच्या चाहत्यांनीही त्याला सुनावले आहे. अमृताने या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत असे म्हटले की, ‘कोण तुम्ही? अशा भाषेत परत बोललात तक पोलीस तक्रार करेन, कळलं? याबाबतीत कोणाचं उगाच ऐकून घेणार नाही.’ अभिनेत्रीला पाठिंबा देण्याऱ्या कमेंट्स तिच्या चाहत्यांनीही केल्या आहेत. एखाद्या स्त्रीबाबत असं बोलणं कोणाला शोभत नाही, अशा भाषेत चाहत्यांनी या व्यक्तीला सुनावलं.

दरम्यान या व्यक्तीने फेसबुकवर केलेली ही कमेंट हटवली आहे. तरीही कमेंट सेक्शनमध्ये अमृताचे चाहते या व्यक्तीच्या असभ्य वर्तनाबाबत टीका करत आहेत. याशिवाय अमृताच्या उत्तराचं कौतुकही चाहते करतायंत.

हे वाचा-कोणताही पक्ष २०० वर्ष टिकत नाही… राजकीय टोलेबाजी करत सयाजी शिंदेंचे आवाहन

चाहत्यांनीही त्या युजरला सुनावलं


अभिनेत्रीच्या पोस्टवर तिचे चाहतेही भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने म्हटले आहे- एखाद्या कलाकाराने श्री गुरुचरित्राबाबत पोस्ट भक्तिभावाने टाकली, तर आपल्याला कुणी अधिकार दिला बोलण्याचा, विनाकारण बुद्धीला ताण देऊ नका! आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘एखाद्या महिलेचा विकृत शब्दामध्ये अपमान करणे शोभत नाही. अमृता खानविलकर या उत्तम कलाकार आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रोफेशननुसार पेहराव करावा लागतो.’ एखाद्या स्त्रीशी कसं बोलावं याचं भान आहे का तुम्हाला असा सवालही या युजरला अमृताचे चाहते विचारत आहेत.





Source link

Leave a Reply