सुप्रिया कर्णिक यांचं खासगी आयुष्य
सुप्रिया यांचा जन्म १३ मार्च १९७५ रोजी मुंबईतील मराठमोळ्या घरात झाला. सुप्रिया यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही. त्यांच्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार त्यांचं लग्न झालं आहे. परंतु त्यांचा नवरा कोण आहे आणि त्यांचं लग्न नेमकी कधी झालं याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याशिवाय त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे याबद्दलही फारशी माहिती कधी समोर आली नाही.
टीव्हीमधून केलं मनोरंजनविश्वात पदार्पण
अनेकांना फारसं माहीत नाही की सुप्रिया यांनी मनोरंजन विश्वामध्ये सिनेमातून नाही तर टेलिव्हिजन जगतातून पदार्पण केलं होतं. त्यांचा सुप्रिया कर्णिक टीव्ही शो (Supriya Karnik TV Shows) खूपच लोकप्रिय झाला होता. यासोबतच अभिनेत्रीने ‘आशियाना’, ‘शांति’, ‘आ गले लग जा’, ‘नीली आंखे’, ‘तहकीकात’, ‘दास्तां’, ‘वो रहने वाली महलों की’, ‘कानून’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.
अनेक सुपरस्टारसोबत केलं काम
छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवल्यानंतर सुप्रिया यांनी मोठ्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली. अभिनेत्रीने शाहरुख खान याच्या परदेस, ताल, जिस देश में गंगा रहता है, ढाई अक्षर प्यार के, जोडी नंबर १, हां मैंने भी प्यार किया है, वाह तेरे क्या कहाना, ये दिल, तलाश, राजा हिंदुस्थानी, एक और एक ग्यारह, खेल, अंदाज, तुझे मेरी कसम,वेलकम, वेलकम बैक, बेवफा, वीरे की वेडिंग, दे दना देन यांसारख्या अनेक सिनेमांत काम केलं.
शाहरुख, सलमान, आमिर आणि अक्षयसोबत केलं काम
सुप्रिया कर्णिक यांनी शाहरुख खानसोबत परदेस, गोविंदासोबत जिस देश में गंगा रहता है, आमीर खानसोबत राजा हिंदुस्तानी, अक्षय कुमारसोबत वेलकम, अंदाज, तलाश तसंच सलमान खानसोबत मुझसे शादी करोगी सिनेमांत काम केलं आहे. सुप्रिया यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती नकारात्मक भूमिकांमुळेच. वेलकम, जिस देश में गंगा रहता है हे त्यांचे सिनेमे खूप लोकप्रिय झाले होते.
नैसर्गिक अभिनयानं निर्माण केली ओळख
सुप्रिया कर्णिक यांचा अभिनय सहजसुंदर आहे. त्या ज्या भूमिका साकारतात त्यात पूर्णपणे समरसून जातात. याचमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात सुप्रिया यशस्वी झाल्या. मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र फारशी सक्रिय नाही. सुप्रिया यांचं इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे परंतु त्यावर अवघ्या २१ पोस्टच आहेत. तर त्यांना फॉलो करणारे १३ ते १४ हजार लोक आहेत.
सिनेप्रवासात आले अनेक चांगले- वाईट अनुभव
एका मुलाखतीमध्ये सुप्रिया यांनी त्यांच्या वाटचालीबद्दल सांगितलं होतं की, ‘माझा मनोरंजन विश्वातील प्रवास एकदम वेगळा आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्या घरातील कुणाचाही संबंध नव्हता. मी इथे कुणालाही ओळखत नव्हती. त्यामुळे मनोरंजन विश्वातील माझा प्रवास खूपच खडतर होता. माझ्या करिअरची सुरुवात टीव्हीमधून झाली. रवी चोप्रा यांनी मला इथे आणलं. त्यानंतर अचानक मला सुभाष घई यांचा फोन आला आणि त्यांनी मला ताल सिनेमाची ऑफर दिली. अशा पद्धतीनं माझा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मला अनेक चांगले वाईट अनुभव आले.’