‘केदारनाथ’ चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली, यानिमित्त साराने ही पोस्ट केली आहे. या सिनेमातून साराने बॉलिवूड पदार्पण केले होते तर सुशांत त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. सुशांत आणि सारामध्ये खूप चांगली मैत्री होती. या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांच्या रिलेशनशिपचीही चर्चा रंगली होती. आज सुशांत या जगात नाही, पण त्याच्या आठवणी चाहत्यांसोबत नक्कीच आहेत. साराने ‘केदारनाथ’च्या सेटवरचे फोटो पोस्ट करत या आठवणींना उजाळा दिला आहे.
हे वाचा-हिनाला ना बॉयफ्रेंडने धोका दिलाय ना तिचं ब्रेकअप झालंय! काय आहे पोस्टमागचं कारण?
साराने लिहिले आहे की, ‘चार वर्षांपूर्वी माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले. हे अजूनही स्वप्नवत वाटते आणि कदाचित असेच वाटत राहील. मी २०१७ मध्ये परत जाण्यासाठी, या सिनेमातील दृश्य पुन्हा शूट करण्यासाठी, प्रत्येत क्षण पुन्हा जगण्यासाठी, काहीही करायला तयार आहे.’ अभिनेत्रीने या पोस्टमध्ये पुढे असे म्हटले की, सुशांतकडून संगीत, सिनेमा, पुस्तकं, आयुष्य, अभिनय, आकाश याविषयी शिकण्यासाठी, प्रत्येक सुर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रोदयाची साक्ष होण्यासाठी, नदीचा आवाज ऐकण्यासाठी, मॅगी आणि कुरकुरे एन्जॉय करण्यासाठी, चार वाजता उठून तयार होण्यासाठी, गट्टू सरांकडून दिग्दर्शित होण्यासाठी आणि पुन्हा एकदा मुक्कू बनण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘आज पौर्णिमेचा चंद्र जेव्हा आज चमकेल, मला माहीत आहे की तेव्हा सुशांत त्याच्या आवडत्या चंद्राजवळ असेल, एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा तो चमकत असेल, जसा तो नेहमी चमकत होता आणि भविष्यातही असेल. केदारनाथ ते एंड्रोमेडा पर्यंत’. अभिनेत्रीने सुशांतसोबतचे असे काही फोटो शेअर केले आहेत जे आतापर्यंत कधी समोर आले नव्हते.
अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच सुशांतच्या चाहत्यांनी अभिनेत्याची खूप आठवण येत असल्याचे म्हटले आहे. ‘सुशांत नेहमी आमच्या हृदयात राहील’, ‘तुझी खूप आठवण येते आहे SSR’, ‘सुशांत तुला शांती लाभो, तुझे चित्रपट नेहमी आवडायचे’ इ. अशा विविध कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
हे वाचा-‘दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली’, अभिनेत्रीवर खळबळजनक आरोप
दरम्यान सारा अली खानच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमीही आज मिळाली. साराने तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आदित्य रॉय कपूरसोबत ती ‘मेट्रो.. इन दिनो’ या सिनेमात दिसणार आहे.