पठाणमध्ये दीपिका पादुकोणच खरी खलनायिका? भगव्या बिकिनीनंतर या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत


मुंबई : पठाण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा दीपिका पादुकोण नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा दीपिका सोशल मीडियावर लक्ष्य झाली आहे. यावेळी दीपिकाची चर्चा होण्यासाठी तिची भगव्या रंगाची बिकिनी नाही तर वेगळेच कारण आहे. काय आहे कारण? जाणून घ्या काय होतेय नेटकऱ्यांमध्ये चर्चा…

यशराज फिल्मने मंगळवारी पठाण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला. पठाण सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघांबरोबर सिनेमात जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जॉन दहशतवाद्याच्या रूपात दिसत आहे. जो भारतावर हल्ला करण्याबाबत बोलताना दिसत आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान सैनिकाच्या भूमिकेत आहे. जॉनची भारतावर हल्ला करण्याची योजना त्याला उद्धवस्त करायची आहे.

हे वाचा-शीझाननंतर ‘अली’ला डेट करत होती तुनिषा? अभिनेत्रीची आई म्हणते- ते फक्त मित्र

ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोणही एक सैनिक दाखवली आहे. ती शाहरुखला त्याच्या मिशनमध्ये मदत करताना दिसत आहे. या ॲक्शन सिनेमामध्ये शाहरुखचा जबरदस्त अंदाज चाहत्यांना बघायला मिळाला आहे. ट्रेलरमध्ये अनेक ठिकाणी शाहरुख खान, जॉन आणि दीपिका ॲक्शन सीन करताना दिसत आहेत. दरम्यान, दीपिकाला पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. नेटकऱ्यांच्या मते सिनेमात केवळ जॉनच नाही तर दीपिकाची देखील नकारात्मक भूमिका आहे.

ट्विटरवर युजर दीपिकाच्या भूमिकेची चर्चा करताना दिसत आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, ‘पठाण चा ट्रेलर पाहून असं वाटतं की दीपिका नकारात्मक भूमिकेत आहे.’ तर अन्य एकानं लिहिलं आहे की, ‘दीपिकाच मुख्य खलनायिका आहे. जॉन नाही? दीपिका शाहरुखला फसवणार का? ट्रेलर पाहून मला ही असंच वाटतं आहे की दीपिकाच सिनेमातील खलनायिका आहे.’ काहींच्या मते दीपिकाची भूमिका रहस्यमय आहे आणि नक्कीच एखादं सरप्राइज पॅकेज असेल. एका युजरच्या मते ‘जरा विचार करा.. पठाण तिच्या प्रेमात वेडा झालेला असताना दीपिका तिचं खरं रूप दाखवेल.’

हे वाचा-जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख! टॉम क्रुझ, जॅकी चेनलाही टाकलं मागे

दरम्यान, पठाण सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित सिनेमा अनेक कारणांमुळे गेल्या काही दिवसांत चर्चेत आला होता. पठाण सिनेमावर बहिष्कार घालण्याची मोहिम अजूनही सुरू आहे. सिनेमातल बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. या गाण्यात दीपिकानं केशरी रंगाची बिकिनी घातल्यामुळे वाद सुरू झाला आणि तो हिंसक आंदोलनापर्यंत येऊन पोहोचला. देशातील अनेक भागांत या गाण्यावरून हिंसक निदर्शनं झाली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमात १२ कट करण्यास सांगितले. हे कट निर्मात्यांनी केले की नाही तसंच गाण्यातून भगव्या रंगाची बिकिनी काढली की नाही हे समजलेलं नाही.



Source link

Leave a Reply