केतकीने नववर्षानिमित्त केलेल्या पोस्टवर एका युजरने कोरेगाव-भीमा शौर्यदिनाविषयी कमेंट केली. या युजरने असे लिहिले की, ‘तमाम भारतीयांना भीमा-कोरेगाव शोर्यदिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे.’ मनीषा ठाकरे नावाच्या युजरने ही कमेंट केली आहे. केतकीने या युजरला रिप्लाय देताना असे म्हटले की, ‘भीमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली? ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही वाटते किंवा तुम्हाला खरा इतिहास माहीत नाही. यातील नेमके काय?’
केतकीने आणखी एक कमेंट करत तिला राष्ट्रद्रोही नव्हे तर ‘धर्मद्रोही’ म्हणायचे होते असेही म्हटले. केतकीने केलेल्या या सोशल मीडिया पोस्टनंतर त्यावरील ही कमेंटही चर्चेचा विषय ठरली.