मला हसायचीही भीती वाटायची… गरोदर असताना पतीचा मृत्यू; कोलमडून पडलेली अभिनेत्री


South Actress Meghana Raj on Husband’s Death: मल्याळम आणि कन्नड सिनेविश्वातील अभिनेत्री मेघना राज हिने २०२० या वर्षात तिच्या आयुष्यातील खूप मोठं दु:ख भोगलं. अभिनेत्रीचा पती चिरंजीवी सर्जा याचे त्यावर्षी निधन झाले. मेघनासाठी ही घटना सहन करणं खूप कठीण होतं कारण त्या दरम्यान ती गरोदर होती. मेघना आणि चिरंजीवी त्यांच्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत होते आणि चिरंजीवीवर काळाने घाला घातला. अभिनेत्रीने अलीकडेच या काळात तिला काय संघर्ष करावा लागला याविषयी भाष्य केले. मेघनाला या काळात केवळ दु:ख आणि वेदनाच नव्हे तर लोकांचे टोमणेही सहन करावे लागले. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने याविषयी भाष्य केले. तिने असे म्हटले की या काळात तिला हसण्याचीही भीती वाटू लागलेली.

दहा वर्षांच्या नात्यानंतर लग्न केलं पण…

मेघना राज हिने एप्रिल २०१८ मध्ये चिरंजीवी सर्जा याच्याशी लग्न केले. त्याआधी दहा वर्ष हे जोडपे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचे हे सुख फार काळ टिकले नाही. ७ जून २०२० रोजी चिरंजीवीचे निधन झाले, जेव्हा मेघना प्रेग्नंट होती. नवऱ्याशिवाय अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील हे क्षण एकटीने सांभाळले. मात्र यावेळी तिला लोकांचे टोमणेही सहन करावे लागले. लोकं काय विचार करतेय यामुळे तिला हसायचीही भीती वाटायची.

वयाच्या ३९ व्या वर्षी चिरंजीवी सर्जाचे निधन

३९ वर्षीय चिरंजीवीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याची पत्नी अभिनेत्री मेघना प्रेग्नंट असल्याने या काळात समोर आलेल्या अडचणींचा तिने एकटीने सामना केला. या मुलाखतीत मेघनाने सांगितले की या दरम्यान ती एकटी रडायची. हा कठीण काळ आठवत अभिनेत्रीने म्हटले की लोकांचे जजमेंट सहन करणं वेदनादायी होतं. या काळात मेघनाला लोक विविध सल्ले देत होते.

दु:खातून सावरण्यासाठी लोकांचे सल्ले

मेघनाने या मुलाखतीत सांगितले की कसे लोक तिच्याकडे यायचे आणि तिने या दु:खातून कसे सावरावे याविषयी सल्ला द्यायचे. त्यांची अपेक्षा होती की यातून कशाप्रकारे सावरावे, पण त्याप्रमाणे होऊ शकत नव्हते असेही अभिनेत्री म्हणाली. अभिनेत्री म्हणाली की तिला तिच्या पद्धतीने परिस्थिती हाताळायची होती. मोठ्याने हसायची तिला भीती वाटायची कारण यामुळे लोक काय विचार करतील असे मनात यायचे. अभिनेत्री म्हणाली की तेव्हा ती खूप घाबरली होती.

पतीच्या निधनानंतर स्वत:ला सावरलं

अभिनेत्री म्हणाली की, ‘मला ही परिस्थिती कशी हाताळायची आहे याची माझी एक पद्धत असू शकते आणि माझ्या पतीच्या भावाची एक वेगळी पद्धत असेल. माझ्याकडे अनेकजण यायचे आणि मला सांगायचे या घटनेचा कुटुंबातील इतर सदस्यांवर याचा जास्त परिणाम झाला असेल, असे वाटत नाही. तेव्हा मला असे वाटायचे की हे तुम्हाला कळणार नाही, कारण प्रत्येकाने तुम्हाला हवी तशी प्रतिक्रिया द्यायला हवी असे नाही.’

​’मी माणूस नाहीये का?’

या घटनेविषयी मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीने तिला कशा कमेंट्सचा सामना करावा लागला हे सांगितले. ती पुढे म्हणाली की, ‘असेही लोक होते की जे म्हणायचे हिच्याकडे आयुष्यात सर्वकाही आहे, तर तिला तुम्ही एवढी सहानुभूती का दाखवत आहात? माझ्याकडे सर्वकाही आहे, कुटुंबाचा पाठिंबा आहे ही चांगलीच गोष्ट आहे. माझे आयुष्य आरामदायी आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की माणूस नाहीये, याचा अर्थ असाही होत नाही की माझे नाते खोटे आहे. याचा अर्थ असा होत नाही मला वेदना होत नाहीत. मला कळतच नव्हते की लोक अशा कमेंट्स कशा करू शकतात.’



Source link

Leave a Reply