हे वाचा-या पाकिस्तानी कलाकारांनी भारतात केलेली तगडी कमाई; शाहरुखची अभिनेत्रीही यादीत
अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये तिचं नाव Rashmika Mandanna ऐवजी उलट म्हणजे annadnaM akimhsaR असं लिहिलेलं दिसतंय. यावरुन तिचं अकाउंट हॅक झालं आहे की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर रश्मिकाच्या अकाउंटचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. यानंतर रश्मिकालाच मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं.
रश्मिकाने फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा स्टंट केल्याचा आरोप तिच्यावर केला जातो आहे. दरम्यान या प्रकारानंतर रश्मिकाचे फॉलोअर्स वाढण्यापेक्षा कमी झाल्याचं निदर्शनास आलं. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉटमध्ये अभिनेत्रीचे ३५.६ मिलियन फॉलोअर्स दिसत असून तर सोमवारी (१२ डिसेंबर) साधारण २.४५ वाजता तिचे अकाउंट तपासलं असता त्यावर ३५.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे जर हा पब्लिसिटी स्टंट असेल तर त्याचा परिणाम उलटाच होत आहे, फॉलोअर्स वाढण्याऐवजी रश्मिकाचे फॉलोअर्स घटलेत. याशिवाय तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
कांतारा न पाहिल्यामुळे रश्मिका ट्रोल
दरम्यान रश्मिका ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. याआधी ‘कांतारा’ सिनेमा न पाहिल्यामुळे रश्मिकाला ट्रोल व्हावं लागलेलं. तिच्याच मातृभाषेतील आणि ज्या भाषेतून काम करण्यास तिने सुरुवात केली त्याच भाषेतील सिनेमा न पाहिल्याने रश्मिकाला टीकेचा सामना करावा लागला. अलीकडेच तिने हा सिनेमा पाहिल्याचे सांगत ट्रोलर्सना उत्तर दिले होते.
हे वाचा-ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्ट; पाहा ग्लॅमरस फोटो
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास रश्मिकाने दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा: द रूल’ या ‘पुष्पा: द राइज’ च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू केले आहे. ऑगस्टमध्ये यानिमित्त पूजा करत मेकर्सनी या दुसऱ्या भागाविषयी घोषणा केली होती. याशिवाय अभिनेत्रीने ‘गुडबाय’ या सिनेमातून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. हा सिनेमा रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणाचा सिनेमा होता.