वाद पेटला! उर्फी जावेदने थेट संजय राठोड आणि चित्रा वाघ यांच्या मैत्रीचाच केला उल्लेख


मुंबई- सोशल मीडियावर आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करत तिला अटक करण्याची मागणी केली होती. आता त्या मागणीवर उर्फी प्रतिक्रिया देणार नाही असं तर होणार नाही. उर्फीनेही तिच्या अंदाजात इन्स्टा स्टोरीमध्ये दिल्लीच्या कांजवाला प्रकरणाचा उल्लेख केला. यावेळी उर्फीने पीडित मुलीच्या आईचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपवरही निशाणा साधला आहे. जावेदने आपल्या पोस्टद्वारे भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर साधला निशाणा

उर्फीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये दिल्लीतील एका हृदयद्रावक घटनेचा उल्लेख केला. अभिनेत्रीने मृत मुलीच्या आईचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, ‘त्यांनी तिला त्यांच्या गाडीखाली १२ किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले. तिची हाडे तुटली, अंगावरचे कपडे गायब झाले आणि पोलीस याला अपघात म्हणत आहेत. हा काय मूर्खपणा आहे? चित्रा वाघ, एक आरोपी तुमच्या पक्षाशी संबंधित आहे. तुम्ही जर इथे आवाज उठवला तर मला जास्त आवडेल.’

उर्फी जावेद इन्स्टा स्टोरी

अनोख्या पद्धतीने दिलं प्रत्युत्तर

ट्विटरवर चित्रा यांच्यावर टीका करताना उर्फीने लिहिले – भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी तुम्हाला माझी मैत्रीण करू इच्छिते. चित्राजी, तुम्हाला संजय आठवतात का?, तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर ते तुमचे चांगले मित्र झाले, तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात ज्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये एवढी धुसफुस केली होती.

उर्फी जावेद इन्स्टा स्टोरी

कोण आहेत संजय?

शिवसेना नेते संजय राठोड २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र सरकारमध्ये वनमंत्री होते पण २०२१ मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वास्तविक, टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूचा आरोप संजय यांच्यावर होता. पूजाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या मृत्यूशी संजय यांचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशा स्थितीत भाजपने हे प्रकरण उचलून धरत संजय यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

कायद्याची भाषा बोलली

उर्फी जावेदने असभ्य कपडे सार्वजनिक ठिकाणी घालू नये याची मागणी केली. यावर उर्फीने प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘नवीन वर्षाची सुरुवात अजून एका राजकारण्याच्या पोलीस तक्रारीने झाली. या राजकारण्यांना काही काम नाही का? हे राजकारणी आणि वकील मूर्ख आहेत का?’

उर्फी जावेद इथेच थांबला नाही. तिने आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, ‘मला तुरुंगात पाठवू शकेल, असे संविधानाचे कोणतेही कलम नाही. असभ्यतेची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. जोपर्यंत माझं गुप्तांग (प्रायव्हेट पार्ट) दिसत नाहीत, तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. हे सर्व माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी केलं जात आहे.’



Source link

Leave a Reply