हेही वाचा – हार्दिक – अक्षयाचा लग्नसोहळा; लग्न, हळद, संगीत, मेंदी, सर्व विधींचे फोटो पाहा एका क्लिकवर
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली परत फ्लोरिडाला गेली आणि तिने तिची एनजीओ सुरू केली. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी तिच्या आयुष्यात पुढे जाऊ शकली नाही. सलमान अनेकदा तिच्या निशाण्यावर असतो. काही दिवसांपूर्वी तिने एक पोस्ट शेअर करत सलमानवर मारहाणीचा आरोप केला होता. आधीच्या पोस्टमध्येही सोमीने सलमानचं नाव घेतलं नव्हतं, पण तिने त्यावेळी ‘मैने प्यार किया’ मधील शॅडो फोटो शेअर केला होता.
‘अनेक वर्ष शारीरिक शोषण, सिगारेटचे चटके’
सोमीने आता पुन्हा सलमानसोबतचा एका फोटो शेअर केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, ‘आता आणखी काही गोष्टी समोर येतील. भारतात माझा शो बॅन केला, माझ्यावर खटला दाखल करण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस, तुझ्या वकिलाला काढून टाक. माझ्या संरक्षणासाठी माझ्याकडे ५० वकील आहेत, तु अनेक वर्षे माझं शारीरिक शोषण केलं, मला सिगारेटचे चटके दिले.’
हेही वाचा – ताजमधली वेटरची नोकरी ते आमिरसोबत टक्कर; वाचा बोमन इराणी यांच्याबद्दल
सोमीने तिच्या पोस्टमध्ये काही शिव्यांचाही उल्लेख केला आहे. त्याशिवाय अशा काही अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे, ज्यांनी सलमानला सपोर्ट केला आहे. ज्या व्यक्तीने महिलेला मारहाण केली, त्याच व्यक्तीला सपोर्ट करणाऱ्या महिलांचा धिक्कारही तिने या पोस्टमध्ये केला आहे. आता लढण्याची वेळ आली असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
डिलीट केली पोस्ट
सोमीने इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट करुन नंतर ती डिलीट केली. पण तिच्या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. एकेकाळी सोमी सलमानची मोठी चाहती होती, आज तोच तिच्या निशाण्यावर आहे. एका मुलाखतीत सोमीने सलमानसोबतच्या ब्रेकअपचं कारणही सांगितलं होतं. सलमानने तिची फसवणूक केल्याचं कारण तिने सांगितलं होतं.