सलमानचा राग, सिनेमाचं शूटिंग थांबलं, नातंही तुटलं…पूजा भट्टला बनायचं होतं खान कुटुंबाची सून, काय होतं प्रकरण?


पूजा भट्टचे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत चांगले संबंध आहेत, पण एकेकाळी पूजा भट्ट सलमानचा द्वेष करायची. यामागे एक कारण सोहेल खानही आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? पूजा भट्ट सलमानचा द्वेष का करायची? पूजा भट्ट, सलमान खान ते सोहेल खानसोबत रिलेशनशिप आणि नंतर ब्रेकअपची काय आहे स्टोरी? ९०च्या दशकात पूजा भट्टची मोठी क्रेझ होती. पूजा भट्ट ज्याप्रमाणे तिच्या फिल्मी करिअरबाबत चर्चेत होती, त्याप्रमाणे ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. रणवीर शौरी ते सोहेल खानपर्यंत पूजा भट्टच्या अफेअरच्या मोठ्या चर्चा होत्या. सोहेल खानने सीमा सजदेहसोहत लग्न केलं असलं, तरी तो त्याआधी पूजा भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता. एका मुलाखतीत पूजा भट्टने ती सोहेल खानसोबत लग्न करणार होती, तसंच ते दोघं भविष्यातील गोष्टीही प्लॅन करत असल्याचं सांगितलं होतं.

सोहेलसोबत लग्नाबाबत काय बोलली होती पूजा भट्ट?

पूजा भट्टने एका मुलाखतीत सोहेलसोबतच्या नात्याबाबत आणि लग्नाबाबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यावेळी मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं होतं, की अनेक लोक आमच्या रिलेशनशिपची एक टाइम लिमिट ठरवत आहेत, पण यावर रिअॅक्ट होऊन मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. सध्या सोहेल दिग्दर्शक म्हणून त्याचं करिअर सुरू करण्याबाबत उत्साहित आहे. मीदेखील सेटल होण्याआधी आणखी दोन वर्ष काम करू इच्छित आहे. मला आणि त्यालाही लग्न करायचं आहे, आम्ही आमचं भविष्य एकत्र पाहत असल्याचं तिने म्हटलं होतं.

खान कुटुंबाचं केलं होतं कौतुक

याच मुलाखतीमध्ये पूजा भट्टने खान कुटुंबाचं कौतुक केलं होतं. पूजाने ते सर्वजण तिच्यावर प्रेम करत असून तिचा सन्मान करत असल्याचं सांगितलं होतं. पूजाने सोहेलचे वडील तिला अतिशय पसंत असल्याचंही म्हटलं होतं. अलवीरा, अरबाजही अतिशय चांगला असल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं होतं. मी आणि सलमान एकमेकांचा द्वेष करत होतो. आम्ही एकही सिनेमा एकत्र केला नव्हता किंवा त्यासाठी इतरही काही कारणं होती. त्यामुळे आमच्यात वाद झाले होते, पण आता सर्वकाही ठिक असल्याचं पूजाने मुलाखतीत सांगितलं होतं.

सलमानचा राग.. या सिनेमाशी जोडला आहे किस्सा

पूजा भट्टने सलमानबाबत केलेल्या वक्तव्याने नेमकं सलमान आणि पूजा भट्टमध्ये कोणत्या गोष्टीवरुन वाद झाला होता याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. सलमान खानच्या कुटुंबात पूजा भट्ट पसंत होती, तरीही सोहेल आणि तिचं लग्न का होऊ शकलं नाही? खान कुटुंबाने पूजा भट्टला त्यांची सून म्हणून का स्वीकारलं नाही? याचा किस्सा ‘राम’ सिनेमाशी जोडलेला आहे. या सिनेमात सोहेल खान दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत होता. तर सलमान आणि पूजाची स्क्रिन शेअर करणार होते. सिनेमात अनिल कपूरही होते.

सलीम खान यांना सलमानने पूजासोबत काम करणं नव्हतं पसंत

रिपोर्टनुसार, सलमान खानने पूजा भट्टसोबत काम करावं हे सलीम खान यांना मान्य नव्हतं. त्यावेळी पूजा ड्रग्सच्या आहारी गेल्याचंही बोललं जातं. सलीम यांच्या नजरेत पूजा भट्ट अतिशय बोल्ड आणि विवादित अभिनेत्री होती. त्यामुळेच त्यांना सलमानने पूजासोबत काम करणं पसंत नव्हतं. त्यानंतर सलमानने आपल्या वडिलांना समजवून सिनेमात काम करायला सुरुवात केली. ‘राम’ सिनेमाचं निम्याहून अधिक शूटिंग झालं होतं. पण काही कारणांनी या सिनेमांचं शूटिंग थांबलं. सिनेमाचं बजेट अधिक झाल्याने ते थांबल्याची माहिती होती.

सिनेमाचं शूटिंग थांबलं, नातं तुटलं…दोन्ही कुटुंबात आला होता दुरावा

सिनेमा बंद होण्यामागे नेमकं कारण काय हे कधीही समोर आलं नसलं, तरी या सिनेमाच्या शूटिंगवेळी सोहेल खान पूजा भट्टच्या प्रेमात पडला असल्याची चर्चा होती. सोहेल आणि सलमानचे वडील सलीम खान यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी या नात्याला विरोध केला. त्यानंतर या दोघांचं नातं तुटलं आणि सिनेमाही बंद झाला. या घटनेनंतर खान आणि भट्ट कुटुंबात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर पूजा भट्ट आणि सलमान खान किंवा आलिया – सलमानने कधीही एकत्र काम केलं नाही. आता या दोन्ही कुटुंबात सर्वकाही ठिक आहे. काही दिवसांपूर्वी पूजा भट्टने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती सलीम खान आणि सलमान खानसह दिसत होती.



Source link

Leave a Reply