स्त्री पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं का? वेगळा विषय घेऊन येतेय नवी मालिका


मुंबई: टेलिव्हिजन हे असे माध्यम आहे ज्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत दररोज पोहोचण्याची संधी कलाकारांकडे असते. त्यामुळे दिग्दर्शक-निर्मात्यांकडून असा प्रयत्न केला जातो की एखादा वेगळा विषय या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत मांडला जावा. अशा विविध धाटणीच्या, विविध विषयावर भाष्य करणाऱ्या मालिका महाराष्ट्रातील लोकप्रिय वाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत. दरम्यान सोनी मराठी वाहिनीवरील अशाच एका मालिकेची सध्या चर्चा सुरूये, या मालिकेत एक लोकप्रिय अभिनेता स्त्रीपात्र साकारणार आहे.

या अभिनेत्याने साकारलेली भूमिका आव्हानात्मक असल्याने सोशल मीडियावर अभिनेत्याचं कौतुक होत आहे. या मालिकेचं नाव ‘प्रतिशोध: झुंज अस्तित्वाची’ असं असून अलीकडेच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला.

हे वाचा-पाकिस्तानी वेब सीरिजमधून पसरवला जातोय हिंदू विरोधी प्रोपगंडा? ट्विटरवर गदारोळ

स्त्री पात्र या अभिनेत्याला ओळखलं का?

प्रतिशोध: झुंज अस्तित्वाची ही मालिका १६ जानेवारी २०२३ पासून सुरू होतेय, ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येईल. दरम्यान या मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने लक्ष वेधून घेतले. हे पात्र साकारणारा अभिनेता आहे ‘अमोल बावडेकर’. अमोलने अशी आव्हानात्मक भूमिका स्विकारल्याने त्याचे कौतुक होत आहे.


अमोल साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नाव ममता असे असून तो एका आईच्या भूमिकेत दिसेल. अमोलसह ‘प्रतिशोध’ मालिकेत पायल मेमाणे मुख्य भूमिकेत आहे. ममता आणि तिची मुलगी दिशा यांची ही कहाणी आहे. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना भविष्यात काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. प्रोमोमध्ये असे दृश्य दाखवले आहे की दागिने खरेदी करण्यासाठी गेलेल्या या मायलेकीवर हल्ला होतो आणि ममताचे अपहरण केले जाते. नेमके कथानक या प्रोमोवरुन स्पष्ट होत नसले तरी मालिकेच्या नावारुन यामध्ये बदला घेण्यासंदर्भात कथानक असावे असा अंदाज आहे.

हे वाचा-अनुष्का शर्माने लग्नाच्या वाढदिवशी विराट कोहलीचं केलं ‘भूत’; क्रिकेटरचे कधीही न पाहिलेले फोटो

सोनी मराठी वाहिनीने प्रोमो शेअर केल्यानंतर अमोल साकारत असलेल्या पात्राचे कौतुक होत आहे. तो साडी, दागिने आणि मेकअप केलेल्या लूकमध्ये सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान याआधी टेलिव्हिजनवर अभिनेता वैभव मांगले यांनी स्त्री पात्र साकारले होते. त्यांनी ‘माझे पती सौभाग्यवती’मध्ये स्त्री पात्र साकारले होते. आता अमोलची भूमिका कोणत्या विषयावर भाष्य करणारी आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.





Source link

Leave a Reply