हे लोक माझा जीव घेतील नाही तर मला… उर्फी जावेदच्या त्या पोस्टनं खळबळ


मुंबई: उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ हा वाद आणखी वाढत असल्याचं चित्र आहे. अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही अभिनयाच्या नावाखाली किळसवाणं अंगप्रदर्शन करत आहे. तिच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन केली होती.

यानंतर उर्फीनं सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. आता तिनं पुन्हा एकदा शेअर केलेल्या एक पोस्टनं खळबळ उडाली आहे. राजकारण्यांविरोधात सोशल मीडियावर लिहिणं जिवावर बेतू शकतं, हे तिनं या पोस्टमध्ये म्हटलंय.

काय आहे उर्फीची ही पोस्ट?
‘मला हे माहित्येय की, राजकारण्यांविरोधात अशी सोशल मीडियावर असं सगळं लिहिण माझ्यासाठी घातक ठरू शकतं. एक तर मी आत्महत्या करेन किंवा असंच त्यांच्या विरोधात बोलत राहिली तर हे लोक माझा जीव घेतीलच. याची सुरूवात मी केली नव्हती. मी कोणासोबतही काही चुकीचं केलं नाहीये. कारण नसताना हे सर्व सुरू केलंय’, असं उर्फीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘महिलांनी कोणते कपडे घालावेत, यासारख्या बाष्कळ विषयांवर चर्चा होते; पण गंभीर विषयांकडे लक्ष दिले जात नाही. ही चर्चा करतानाही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच लक्ष्य केलं जातं,’ असा आरोप करताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.



Source link

Leave a Reply