Bollywood Controversies : २०२२ मध्ये बॉलिवूड कॉन्ट्रोवर्सीजने माजवली खळबळ, देशभरात होती एकच चर्चा


द कश्मीर फाइल्स

या वर्षातील बॉलिवूडची सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी ठरली. सिनेमाच्या टायमिंगपासून ते ग्राफिक्स सीन, काश्मीरी पंडितांची स्थिती अशा सर्वच बाबींवरुन सिनेमाला घेरण्यात आलं. यावरुन अनेक वाद निर्माण झाले. सिनेमातील काश्मीरी पंडितांच्या सिनेमात दाखवण्यात आलेल्या परिस्थितीला काहींनी विरोध केला तर काहींनी चुकीचं दाखवण्यात आल्याचं म्हटलं. संपूर्ण भारतात यावरुन वाद निर्माण झाले होता. या सिनेमावरुन अनेक ठिकाणी दोन गटांमध्ये झटापट झाल्याचंही समोर आलं होतं. सिनेमाला धार्मिक कारणांमुळे म्हणा किंवा वादामुळे सिनेमाची मोठी कमाई झाली. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने २०० कोटीहून अधिक कमाई केली. कश्मीर फाइल्सवरुन अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपापली मतंही मांडली होती. त्यावरुन वाद झाले होते. पण याचाच फायदा काहीअंशी सिनेमाला झाल्याचं पाहायला मिळालं. वादातही सिनेमाने मोठी कमाई केली.

रणवीर सिंह न्यूड फोटोशूट

रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट या वर्षातील वादग्रस्त गोष्टींपैकी एक ठरलं. २२ जुलै रोजी रणवीरच्या न्यूड फोटोशूटने एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी रणवीरच्या या फोटोशूटला विरोध केला, तर अनेक जणांनी त्याला पाठिंबा दिला. अनेकांनी रणवीरचं हे शूट एक अतिशय बोल्ड पाऊल असल्याचं म्हटलं, तर काहींनी हे अश्लील असल्याचंही म्हटलं होतं.

काली कॉन्ट्रोवर्सी

एका पोस्टरमुळे हा वाद मोठ्या प्रमाणात वाढला होता. पोलिसांत तक्रार ते हिंदूंच्या भावना दुखावण्यापर्यंत अनेक गोष्टी या वादात झाल्या. या वादाची सुरुवात ‘काली’ नावाच्या डॉक्युमेंट्री पोस्टरपासून झाली. या पोस्टरमध्ये काली मातेच्या रूपातील एक महिला सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हे पोस्टर २ जुलै रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं होतं. त्यानंतर ‘काली’च्या दिग्दर्शकांना अटक करण्याची मागणी होऊ लागली होती.

लाल सिंह चड्ढा

लाल सिंह चड्ढा सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. या सिनेमात लष्कराचा अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचं बोललं जात होतं. त्यावरुनच सिनेमाला ट्रोल केलं जात होतं. या सिनेमात एक असा डायलॉग होता, ज्यावरुन मोठा वाद झाला होता. सिनेमात आमीर खानचा, ‘माझ्या आईने म्हटलं होतं, पूजा-पाठ मलेरिआ आहे, हे दंगली घडवतं’ असा डायलॉग होता. यावरुन हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. याच कारणामुळे लाल सिंह चड्ढा बॅन करण्याची मागणी करण्यात आली होती.

ब्रह्मास्त्र

ब्रह्मास्त्र सिनेमात कोणत्याही हिंदू देवदेवतांचा अपमान झाला नाही, की इतर कोणतीही कॉन्ट्रोवर्सी या सिनेमात नव्हती. मात्र हा सिनेमा बॉयकॉट होण्याची मागणी करण्यात आली होती. रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी एका जुन्या व्हिडिओमध्ये त्याला बीफ खाणं आवडत असल्याचं म्हटलं होतं. याच व्हिडिओवरुन काही हिंदू संघटनांनी रणबीरला ट्रोल करण्याल सुरू केलं होतं. ब्रह्मास्त्र सिनेमा प्रदर्शि होण्याआधी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी, अभिनेता रणबीर आणि आलिया भट्ट उज्जैन मंदिरात पोहोचले होते. त्यावेळी बजरंग दलाकडून निदर्शनं करण्यात आली होती.

वीर दास

कॉमेडियन वीर दासबाबत पुन्हा एकदा कॉन्ट्रोवर्सी होऊ लागली. याआधीही वीर दासच्या काही वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. पण यावेळी मात्र त्याचे शो रद्द करण्याची मागणी झाली. राइट विंग ग्रुपकडून त्याचे अनेक शो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याची सुरुवात युनायटेड स्टेट्समधील त्याच्या एकपात्री अभिनयाने झाली ज्यात त्याने भारताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता.



Source link

Leave a Reply