छय्या छय्यासाठी माझी निवड पण ऐनवेळेस मलायकाने… २३ वर्षानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


मुंबई- नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आज अनेकांच्या विस्मरणात गेली आहे. शिल्पा ही महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिची बहीण आहे. तिने अनिल कपूरसोबत ‘किशन कन्हैय्या’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिला बहीण नम्रता एवढी लोकप्रियता मिळू शकली नाही. तरीही जेवढी वर्ष शिल्पाने बॉलिवूडमध्ये काम केलं तेवढी वर्ष ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. परंतु, आपल्या वजनामुळे तिने बॉलिवूडमध्ये अनेकदा रिजेक्शनचा सामना केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. ‘दिल से’ चित्रपटातील ‘छय्या छय्या’ या गाण्यासाठीही माझी निवड झाली होती असं तिने मुलाखतीत सांगितलं. फराह खानने ऐनवेळेस तिला बाहेर केलं असं तिने म्हटलं.

शिल्पाला नकार दिल्यानंतर मलाइकाला केलं साइन
कधीकाळी शाहरुख खानच्या ‘दिल से’ चित्रपटातील ‘छय्या छय्या’ गाण्यासाठी निवड करण्यात आल्यानंतर अचानक काढून टाकण्यावर शिल्पा म्हणाली, ‘शाहरुखच्या चित्रपटात काम करावं असं कुणाला वाटणार नाही? मला फराह खानने या चित्रपटात घेतलं. मला गाण्यासाठी साइन केलं आणि अचानक एके दिवशी म्हणाली की, तुला आम्ही घेऊ इच्छित होतो पण तू जाड आहेस. त्यामुळे आता तुला नाही घेणार. तुझ्याजागी मलायकाला साइन केलंय. मला वाटत नाही की माझं वजन किंवा माझ्या दिसण्याने माझं यश किंवा मला मिळालेलं प्रेम कमी झालं. नव्वदच्या दशकात या गोष्टींना महत्त्व नव्हतं. आम्ही एकाच वेळी अनेक प्रोजेक्टवर काम करायचो. अनेक शिफ्टमध्ये काम केलं. आजच्या काळात मला पदार्पण करायचं असतं तर आज मला काम मिळालंच नसतं. विचार करा की जर ९० च्या दशकात ते लोक मला ‘लठ्ठ’ म्हणायचे. तर आता माहीत नाही काय काय बोलले असते.’


मिथुनदामुळे इण्डस्ट्रीत
शिल्पा पुढे म्हणाली की आज ती जर इण्डस्ट्रीत काम करत असेल तर त्यामागे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची साथ आहे. त्याचवेळी अनिल कपूर यांनीही तिला खूप मदत केली. शिल्पा म्हणाली, ‘मला आठवतं ९० च्या दशकात एका तेलगू चित्रपटाचं कास्टिंग सुरू होतं आणि अनिल हैदराबादमध्ये शूटिंग करत होते. त्यांनी माझा फोटो अल्बम निर्माता आणि दिग्दर्शकाकडे नेला आणि मला चित्रपट मिळाला. मी आज या इंडस्ट्रीत काम करण्यामागचे कारण म्हणजे मिथुनदा. जेव्हा माझ्या हातून ‘सौतन की बेटी’ आणि ‘जंगल’ काढून घेतली गेली तेव्हा लोक मला अपशकुनी म्हणायला लागले. पण मिथुन होते ज्यांनी मला ‘भ्रष्टाचार’ मध्ये भूमिका मिळवून दिली आणि माझ्या करिअरची सुरुवात झाली.






Source link

Leave a Reply