अतिशय प्रतिष्ठित असा नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ राजाभाऊ मोरे यांना प्रदान करण्यात आला होता. रंगभूमीला समर्पित केलेल्या जीवनाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तत्कालीन नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनात ३३ वर्षांपूर्वी राजाभाऊंनी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली होती. सध्या या नाट्य परिषदेचे जवळपास ५०० सदस्य आहेत.
अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा राजाभाऊ यांनी नाट्य चळवळ सुरू केली आणि रुजवली. त्यांनी आझाद हिंद मंडळाच्या वतीने सतत ४० वर्ष स्पर्धामध्ये नाटक सादर केले. याशिवाय त्यांनी १०० हून अधिक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. त्यांना आजवर विविध पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. नेपथ्य कलेतही ते अग्रेसर होते, शिवाय त्यांनी त्यांच्या हयातीत विविध नाट्यसंस्थांनाही मदत केली होती. राजाभाऊ सामाजिक, राजकीय, क्रीडा विभागातही सुद्धा सतत कार्यरत होते. त्याच्या