पठाण वादादरम्यान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचला शाहरुख; म्हणाला-जगाने काही केले तरी…


कोलकाता: २८ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज सुरूवात झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये या फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता शाहरुख खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून हे कलाकार या सोहळ्यात उपस्थित होते. दरम्यान महेश भट्ट, राणी मुखर्जी, कुमार सानू, जया बच्चन, शतृघ्न सिन्हा, अरिजीत सिंह या कलाकारांनीही या महोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

दरम्यान ‘पठाण’ सिनेमाबाबत सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख या महोत्सवात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सोहळ्यातील शाहरुख खानचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

या सोहळ्यात बोलताना शाहरुखने सिनेमा आणि सोशल मीडिया याविषयी भाष्य केले. सोशल मीडियावर पठाण सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. पठाणवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. अशावेळी शाहरुखची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरली. शाहरुखने असे म्हटले की, ‘सोशल मीडिया अनेकदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालवले जाते, जे मानवी स्वभावाला त्याच्या मूलभूत स्वार्थापुरते मर्यादित करते. मी कुठेतरी वाचले आहे नकारात्मकतेमुळे सोशल मीडियाचा वापर वाढतो.’

हे वाचा- दीपिका आणि कॉन्ट्रोव्हर्सी: दीपिकावर आता भगव्याचा अपमान केल्याचा आरोप, आधी मिळालेली जीवे मारण्याची धमकी

शाहरुखचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने असे म्हटले की, ‘काही दिवसांपासून आम्हाला इथे येता आले नाही, तुम्हाला भेटता आले नाही. पण आता जग पूर्वपदावर आले आहे, आपण आनंदी आहोत आणि मी सर्वात जास्त आनंदी आहे. हे सांगताना मला काहीच अडचण नाही की जगाने काहीही केलं तरी मी, तुम्ही लोक आणि जी सकारात्मक माणसं आहेत ते सर्व जिवंत आहेत.’

हे वाचा-शाहरुख खानच्या सिनेमात भगव्या रंगाचा अपमान झाल्याचा आरोप; दीपिकाच्या त्या बोल्ड ड्रेसवरुन हिंदू महासभेचा इशारा

एएनआय वृत्तसंस्थेने शाहरुखचे हे व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावरही ट्रोलिंग करणाऱ्या कमेंट्सचा सामना किंग खानला करावा लागला. मात्र त्याचे चाहतेही त्याला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स करत आहेत. दरम्यान यावेळी कोलकातामधील प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यात शाहरुख मागे पडला नाही. कारण त्याने बंगाली भाषेत भाषणाला सुरुवात करत चाहत्यांचे हालहवाल विचारले. याशिवाय त्याने कोलकातामध्ये दीर्घकाळानंतर येऊन त्याला किती आनंद झाला, याविषयी भाष्य केले.



Source link

Leave a Reply