IPL 2023 Auction: विकत घ्यायला ती वस्तू आहे का? अजिंक्य रहाणेचा फोटो शेअर करत का भडकले शरद पोंक्षे


मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. राजकीय, सामाजिक आणि मनोंरजन क्षेत्रातील विविध विषयांवर ते परखड मत व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पोस्ट अनेकदा चर्चेत आल्या आहेत. आता शरद पोंक्षेंनी केलेली आयपीएल लिलावासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अजिंक्य रहाणेचा फोटो शेअर करत त्यांनी या लिलावासंदर्भात टीका केली आहे.

आयपीएल २०२३ साली क्रिकेटरसिक उत्सुक आहेत. आयपीएल २०२३ चा लिलाव पार पडला आणि खऱ्या अर्थाने IPL च्या सोहळ्याला सुरुवात झाली असे म्हणता येईल. ८७ जागांसाठी आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव पार पडला. कोचीन याठिकाणी पार पडलेल्या या लिलावात १० फ्रँचायझींनी विविध खेळाडूंवर बोली लावली. अनेकांना आपल्या आवडत्या खेळाडूला संघात सामील करत आले, तर काहींना या खेळाडूंना गमवावं लागलं. दरम्यान भारतीय संघातील स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणेवर चेन्नई सुपरकिंग्जने ५० लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं. पोंक्षेंनी त्याचाच फोटो शेअर करत संताप व्यक्त केला.

हे वाचा-बदलली ‘बबिता’ची चाल; दारुची नशा की प्रेग्नंट आहे अभिनेत्री? Video पाहून चाहते हैराण

काय म्हणाले शरद पोंक्षे?

एका मराठी वृत्तवाहिनीने अशी बातमी दिली होती की, ‘५० लाखांना चेन्नईने अंजिक्य रहाणेला विकत घेतलं.’ यावरच पोंक्षे भडकले आणि त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यांनी स्क्रिनशॉट शेअर करत असे म्हटले की, ‘विकत जायला ती वस्तू आहे का? ही दळीद्री पत्रकारिता. त्या खेळाडूचं ते मानधन आहे. ते अशा विकृत पध्दतीन जाहीर करायला लाज कशी वाटत नाही?’ अनेक युजर्सनी कमेंट करत पोंक्षेंच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे.

चाहत्यांच्या कमेंट्स

पोंक्षेंच्या पोस्टवर एकाने लिहिले आहे की, ‘दुर्दैव आहे पण खेळाचा धंदा झाल्यावर हीच भाषा असणार सर, कोट्यवधी पैशांची देवाण घेवाण याच नजरेने काही लोक क्रिकेट कडे पाहतात. दुःख आहे’. अन्य एकाने लिहिले की, ‘१०० टक्के खरं आहे’. काहींनी अशी कमेंट केलीये की पोंक्षेंनी एक मार्मिक विषयावर बोट ठेवले आहे.

हे वाचा-विकी कौशल अमेयच्या प्रेमात, फास्टर फेणे’ही पाहिला; म्हणाला- त्याच्यासोबत काम करायचं होतं

यावेळी झालेल्या आयपीएल लिलावात ४०५ खेळाडू सहभागी झाल होते. जागा जरी ८७ होत्या असल्या तरी ८० खेळाडूंना बोली लावली गेली. या खेळाडूंपैकी २९ खेळाडे विदेशी आहेत. सर्व फ्रँचायझींनी १६७ कोटी रुपये खर्च करत खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करून घेतले. यावर्षी सॅम करत सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याच्यावर १८.५० लाखाची बोली लावून पंजाब किंग्जने त्याला आपल्या संघात सहभागी केले.



Source link

Leave a Reply