सुखी संसाराची २२ वर्ष अन् आता प्रसिद्ध अभिनेता देतोय पत्नीला घटस्फोट? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण


मुंबई: सुपरस्टार थालापती विजय दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या विजय त्याचा अॅक्शन चित्रपट ‘वारीसू’च्या प्रदर्शनाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक बातमी पसरली. सोशल मीडियाद्वारे असे समोर आले की तो आणि त्याची पत्नी संगीता घटस्फोट घेत आहेत. चाहत्यांसाठी हे वृत्त धक्कादायक होते.

थालापती विजय आणि संगीता यांच्या लग्नाला २२ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांचे रिलेशनही खूप चांगले आहे. असे असूनही त्यांच्या घटस्फोटाची बातमी येणं चाहत्यांसाठी खूप धक्कादायक होतं. विजयचे खासगी आयुष्य नेहमी गुलदस्त्यातच असते, मात्र ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. दरम्यान ही अफवाच आहे, हेही वेळाने स्पष्ट झाले. पिंकविला मधील एका वृत्तानुसार, विजयच्या विकीपीडिया पेजवर तो आणि त्याची पत्नी घटस्फोट घेत असल्याचे कोणीतरी नमुद केले होते. त्यानंतर ही घटस्फोटाची अफवा सुरू झाली. मात्र असे काही नसून दोघांमध्येही सारेकाही आलबेल आहे.

हे वाचा-फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री चढणार बोहल्यावर; जिम ट्रेनरसोबत केला साखरपुडा

ऑडिओ लाँच सोहळ्यात नव्हती संगीता

आणखी एका गोष्टीने या वृत्ताला हवा दिली, ते म्हणजे अलीकडेच पार पडलेल्या ‘वारिसू’च्या ऑडिओ लाँच सोहळ्यात विजयची पत्नी संगीता उपस्थित नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार संगीता सध्या तिच्या मुलांसोबत यूएसमध्ये सुट्टी घालवत असल्याने ती या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. लवकरच विजयही सुट्टीसाठी कुटुंबासोबत बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

कशी सुरू झाली अफवा?

विजयच्या विकिपीडिया पेजवर असे अपडेट झाले होते की तो आणि त्याची पत्नी परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार या बातम्या खोट्या आहेत, त्यांच्यात काही तथ्य नाही. विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाचे वृत्त निराधार असून याची सुरुवात नेमकी कशी झाली हे आम्हालाही माहीत नाही, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

हे वाचा-तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवायला वेळ, हा नंगानाच थांबवायला नाही?- चित्रा वाघ

कशी झाली होती विजय-संगीताची भेट?

‘पूवे उनक्कागा’च्या रीलिजनंतर संगीता आणि विजयची भेट झाली होती, असे बोलले जाते. ती विजयची खूप मोठी फॅन होती आणि फक्त त्याला भेटण्यासाठी संगीताने ब्रिटनमधून चेन्नई गाठले. तिच्या कुटुंबाशीही भेट घालून दिली. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे कुटुंबीयही या नात्यासाठी तयार झाले. २५ ऑगस्ट १९९९ साली विजय-संगीत विवाहबंधनात अडकले. या कपलने हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर एका वर्षाने त्यांनी मुलगा जेसन संजयचे स्वागत केले, तर २००५ साली त्यांना दिव्या साशा नावाची मुलगीही झाली.



Source link

Leave a Reply